राज ठाकरेंनी पाळला राज्यपालांचा शब्द, शरद पवारांना केला फोन!

राज ठाकरेंनी पाळला राज्यपालांचा शब्द, शरद पवारांना केला फोन!

दूध उत्पादक शेतकरी आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्यांवर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery)  यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari)  यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यपालांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. अखेर राज यांनी राज्यपालांचा सल्ला मान्य करत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली आहे.

दूध उत्पादक शेतकरी आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्यांवर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी राज यांनी सर्वसामन्याच्या वीज बिलात झालेली वाढ कमी करण्यात यावी, याबद्दल चर्चा केली.

उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार? काय म्हणाले संजय राऊत

तसंच, 'आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे', अशी मागणीही राज ठाकरेंनी केली. यावेळी राज्यपालांच्या भेटीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.

राज ठाकरे यांनी 29 ऑक्टोबर रोजी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाबद्दल राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिले होते.  यावेळी राज्यपालांनी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता.

रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याचा प्रताप,बनावट आदेश दाखवून ठेकेदाराला 3 कोटींना लुटले

'लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही.  म्हणून राज्यपालांची भेट घेतली असल्याचे राज यांनी सांगितले होते.

त्याचबरोबर, 'एका छोट्याशा विषयाला इतका वेळ लावण्यात आला आहे. कळतं नाही नेमकं काय अडकलं आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहे', असंही राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज राज यांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केली.

Published by: sachin Salve
First published: October 30, 2020, 1:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading