मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यपालांच्या पत्रानंतर ठाकरे सरकार लागले कामाला, कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

राज्यपालांच्या पत्रानंतर ठाकरे सरकार लागले कामाला, कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

 आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन (Vidhan Bhavan) येथे होत आहे.

आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन (Vidhan Bhavan) येथे होत आहे.

आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन (Vidhan Bhavan) येथे होत आहे.

मुंबई, 18 फेब्रुवारी : विद्यमान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाबाबत (  vidhan sabha assembly speaker) निवडणूक कधी घ्यायची याबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत. आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन (Vidhan Bhavan) येथे होत आहे. आजच्या या बैठकीत विधानसभा अध्यक्षपद तसंच एक मार्चपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन याबाबत सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते चर्चा करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यासह सर्व प्रमुख पक्षाचे नेते आजच्या बैठकीला विधिमंडळात उपस्थित असणार आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा होईल, अर्थसंकल्पीय अधिवेशन यामध्ये कोणती विधेयके आणायची कोणत्या विषयावर चर्चा करायची याची प्राथमिक चर्चा आजच्या बैठकीत होईल तसंच रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदाबाबत देखील चर्चा होईल, असे समजते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वीच राज्य सरकारला रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारणा केली आहे संबंधित पदाबाबत निवडणूक कधी घ्यायची, असा प्रश्न विचारून फक्त पाठवण्याची माहिती मिळाली आहे. या विषयावर बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत चर्चादेखील केली आहे. राज्यातील एक मार्चपासून होणार या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत राज्यातील मंत्र्यांच कल असल्याची माहिती मिळते.

आजच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक दोघेही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुका कार्यक्रमाबाबत प्राथमिक चर्चा करतील आणि त्यानुसार राज्य सरकार राज्यपालांना कळवेल, अशी माहिती मिळत आहे. आजच्या बैठकीनंतर राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात याकडे देखील लक्ष आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा सर्वाधिकार राज्यपालांना असून राज्यपाल या संबंधित निवडणूक कार्यक्रम जाहीर करत असतात. अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आल्याने या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे, असे जवळपास स्पष्ट होत आहे.

First published:
top videos