udCमुंबई, 28 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आले आहे. महाविकास आघाडी सरकार आता पडणार अशी चर्चा रंगली असून लवकरच नवे सरकार येणार आहे. पण हे नवे सरकार आता अमावस्या (amavasya june 2022 timing) संपण्याची वाट पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभुतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३८ आमदार आणि अपक्षांना घेऊन बंड पुकारले आहे. मागील सात दिवसांपासून सर्व आमदार हे गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. रोज महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या चर्चा आणि शक्यतांना ऊत आला आहे. आता नवे सरकार येण्यासाठी अमावस्या आड आल्याचे समोर आले आहे.
अमावस्या संपल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे अविश्वासाबद्दल पत्र जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी 08:41 पर्यंत अमावस्या आहे तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा गट म्हणून पुढे येण्यास अनेक अडचणी आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी प्रहार संघटनेकडून बच्चू कडू राज्यपालांना अविश्वास प्रस्तावाबाबत पत्र देऊ शकतात किंवा एकनाथ शिंदे गटाकडून पत्र दिलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकल्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी सोबत आहे.
एकनाथ शिंदे हे गेल्या ७ दिवसांपासून गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आज सातव्यादिवशी भाजपच्या गोटामध्ये कालपासून घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहे. खाजगी विमानाने मुंबईहुन दिल्लीला निघाले आहे. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर नवी दिल्लीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहे.विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे वकिल महेश जेठमलानी हे फडणवीस यांच्यासोबत आहे. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.