दसऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची अयोध्येकडे कूच,रामाची पूजा करून घेणार सभा !

रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष मं. जन्मेजयशरण महाराज यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात भेट घेतली

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2018 07:51 PM IST

दसऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची अयोध्येकडे कूच,रामाची पूजा करून घेणार सभा !

उदय जाधव,मुंबई,03 आॅक्टोबर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीये तशी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा पुढे केलाय. आता दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार आहे. आणि तिथे रामाची पूजा करणार असल्याची माहिती रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष मं. जन्मेजयशराज महाराज यांनी दिली.

अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर शिवसेना आक्रमक झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन राम जन्मभूमीचं दर्शन घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आज रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासचे अध्यक्ष मं. जन्मेजयशरण महाराज यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अयोध्या रामजन्मभूमीवर होणारी पूजा आणि त्याठिकाणी होणाऱ्या सभेची तारीख याबद्दल चर्चा झाल्याचं कळतंय.

बैठक संपल्यानंतर मं. जन्मेजयशरण महाराज यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. दसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन राम मंदिर जन्मभूमीचं दर्शन घेणार आणि पूजा ही करणार आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत सभाही घेणार आहे. तिथेच अवधवासियांच्या सोबत राम मंदिर निर्माण करण्याचं नियोजन केलं जाईल आणि वेळ ठरवली जाईल अशी माहितीही जन्मेजयशरण महाराज यांनी दिली.

समुद्राला जशी सर्व नदी मिळतात. तशीच सर्व समाज घटक एकत्र येऊन राम मंदिर बनेल. राम मंदिरचा नारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही दिला होता. आता तो उद्धव ठाकरेंनी देखील दिलाय. त्यामुळे लवकरच राम मंदिर बनेल असा विश्वासही जन्मेजयशरण महाराज यांनी व्यक्त केला.

Loading...

दरम्यान, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी कधी जाणार याची तारीख जाहीर करतील. आम्ही तयारीला लागललो आहोत अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

भाजपचं केंद्रात बहुमत आहे. जर अनेक विषयांत भाजप सरकार अध्यादेश काढू शकते. तर मग राम मंदिर संदर्भात देखील अध्यादेश काढून राम मंदिर निर्माण कार्य सुरू करू शकतो. राम मंदिर संदर्भात शिवसेनेनं कधीच फसवणूक केलेली नाहीये. अगदी बाबरीच्या ढाच्यावर हातोडा मारण्यापासून ते आतापर्यंत सातत्याने राम मंदिरावर शिवसेना ठाम आहे असंही राऊत म्हणाले.

भाजपचं सरकार रामाच्या नावावर आलंय. आता तर पूर्ण बहुमताचं सरकार आहे. तरी देखील राम मंदिर निर्माण होत नसेल तर या देशातील हिंदुत्वाचं दुर्दैव आहे अशी टीकाही राऊत यांनी केली.

----------------------------------------------------------------

VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...