मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

चक्रीवादळानंतर मुंबईच्या किनारपट्टीसमोर नवी समस्या, महापालिका कसा करतेय सामना?

चक्रीवादळानंतर मुंबईच्या किनारपट्टीसमोर नवी समस्या, महापालिका कसा करतेय सामना?

तौक्ते चक्रीवादळाने राज्यात (Cyclone Tauktae) मुंबईसह कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. या चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र चांगलाच खवळलेला होता. यावेळी आणखी एक समस्या किनारपट्टी भागात निर्माण झाली आहे

मुंबई, 21 मे: तौक्ते चक्रीवादळाने राज्यात (Cyclone Tauktae) मुंबईसह कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. या चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र चांगलाच खवळलेला होता. समुद्रात 4 मीटर उंचीच्या लाटा तयार झाल्या होत्या. दरम्यान वादळामुळे झालेल्या नुकसानाबरोबरच मुंबई किनारपट्टीवर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या त्याच बरोबर समुद्रात असलेला कचरा किनाऱ्यावर फेकला गेला. खवळलेल्या समुद्रातून मुंबईतील सात चौपाट्यांवर चार दिवसांत सुमारे 153 मेट्रिक टन कचरा किनाऱ्यांवर आला होता. मुंबईमध्ये गिरगाव, दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ आणि गोराई या प्रमुख सात चौपाट्या आहेत. या सात चौपाट्यांची मिळून एकूण लांबी 35.5 किलोमीटर इतकी आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र खवळल्यानंतर मुंबईतील सातही चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आलेला आढळला. वादळाची तीव्रता असतानाही चारही दिवस म्हणजे दिनांक 15 ते 18 मे 2021 या चारही दिवशी नियमितपणे चौपाट्यांवर स्वच्छता करण्यात आली. त्यात कोणताही खंड पडला नाही. दिनांक 15 मे 2021 रोजी 33 हजार 110 किलोग्रॅम, 16 तारखेला 39 हजार 610 किलोग्रॅम, 17 मे ला 19 हजार 100 किलोग्रॅम तर दिनांक 18 तारखेला तब्बल 62 हजार 10 किलोग्रॅम इतका कचरा हटवण्यात आला आहे. म्हणजेच, तौक्तेच्या प्रभावाखाली असलेल्या चारही दिवसांत, सातही चौपाट्यांवर मिळून 153 मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे.

हे वाचा-नेमकं काय घडलं 'त्या' रात्री; का बुडालं बार्ज P305? जाणून घ्या

महापालिकेकडून मुंबईतील या चौपाट्यांची स्वच्छता राखण्यासाठी 24x7 तत्त्वावर कार्यरत राहणारी यंत्रणा आवश्यक त्या संयंत्रांसह आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आलं आहे. यामध्ये चौपाटी स्वच्छता करण्यासाठी विशेष संयंत्रे जोडलेले ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, 240 लीटर क्षमतेचे कचऱ्यांचे डबे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. किनाऱ्यांवर सातत्याने येणारा कचरा नियमितपणे हटवून स्वच्छता ठेण्यासाठी होत असलेल्या विशेष प्रयत्नांमुळे चौपाट्या सदैव स्वच्छ राहत आहेत.

हे वाचा-मुंबईच्या समुद्रात मृत्यूतांडव सुरूच, आणखी 4 मृतदेह सापडले,मृतांची संख्या 41 वर

मात्र खरी समस्या अशी आहे की, हा कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्रातून बाहेर आला आहे. याचाच अर्थ मुंबईतील घाण पाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडलं जातं, या पाण्याबरोबर लाखो टन कचरा समुद्राच्या पाण्यात मिसळला जातो. हा कचरा निसर्गाने पुन्हा मुंबईकरांना परत दिला आहे.

First published: