युतीनंतर मुख्यमंत्र्यांची 'डिनर डिप्लोमसी', 'वर्षा'वर नेत्यांची मांदियाळी

युतीनंतर मुख्यमंत्र्यांची 'डिनर डिप्लोमसी', 'वर्षा'वर नेत्यांची मांदियाळी

या स्नेहभोजनासाठी शिवसेना आणि भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 25 फेब्रुवारी :  शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर आता अंतर्गत कटुता दूर करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. वर्षा बंगल्यावर हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहभोजनाचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बंदी घालण्यात आली आहे.

या स्नेहभोजनासाठी शिवसेना आणि भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत. या स्नेहभोजनाला घटकपक्षांनाही बोलावण्यात आलं आहे.

काही वेळापूर्वीच शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहे. रिपाइंचे नेते रामदास आठवलेही वर्षावर पोहोचले आहे.

मात्र, भाजप आणि शिवसेना आमदारांच्या स्नेहभोजनाच्या कव्हरेजसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाणारे रस्ते पत्रकारांसाठी बंद करण्यात आले आहे. बॅरिकेड्स लावून रस्ते अडवण्यात आले आहे. तसंच छायाचित्रकारांनीही परवानगी नाकारण्यात आली आहे.

आठवले नाराज

शिवसेना आणि भाजपच्या युतीनंतर आता मित्रपक्षांची नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल अशा शब्दात रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनी निर्वाणीचा इशारा दिला. आज मुंबईकील पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा त्यांची नाराजी बोलून दाखवली.. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंला किमान 2 जागा मिळाव्या. तसंच, विधान परिषदेवर रिपाईचे 2 आमदार पाठवले जावेत, अशी मागणी आठवलेंनी केली.

=============

First published: February 25, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading