शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोना लस

शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोना लस

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे कोरोनाची लस घेतली.

  • Share this:

मुंबई, 01 मार्च : कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्यापाठोपाठ त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कोरोनाची लस घेतली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे कोरोनाची लस घेतली. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी त्यांना लस दिली. सरकारने आजपासून 1 मार्च तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात केली आहे. आपणही नोंदणी करुन लस अवश्य घ्यावी, असे आवाहन सुळे यांनी केले आहे.

त्याआधी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही कोरोनाची लस घेतली.

शरद पवार यांनी पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर त्यांना 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल. त्यांची प्रकृती पुर्णपणे ठीक आहे, अशी माहिती वैद्यकीय संचालक, डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

पंतप्रधान मोदींनी घेतली लस

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्दचेरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोनाची लस दिली आहे.

Published by: sachin Salve
First published: March 1, 2021, 4:31 PM IST

ताज्या बातम्या