Home /News /mumbai /

राजस्थानमधल्या बंडानंतर मुख्यमंत्री ठाकरे सावध, पवार आणि थोरातांशी बंदव्दार चर्चा

राजस्थानमधल्या बंडानंतर मुख्यमंत्री ठाकरे सावध, पवार आणि थोरातांशी बंदव्दार चर्चा

महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याच वारंवार बैठका होत होत्या. त्यामुळे काँग्रेसकडे दूर्लक्ष होतंय का अशी चर्चाही राजकिय वर्तुळात सरू होती.

मुंबई 13 जुलै: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या भेटीकरता आले. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पवारांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. आठवडाभरात या दोन्ही नेत्यांची ही चौथी बैठक आहे. त्यामुळे आघाडीत नेमकं काय चाललं याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तर मी नियमित मुख्यमंत्र्यांची भेट घेतो त्यात फारसं काहीही नाही असं स्पष्टीकरण शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच दिलं होतं. राजस्थानमधल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध झाले असून नाराज असलेल्या काँग्रेससोबत संवाद वाढविण्याचे संकेत त्यांनी दिल्याचं बोललं जात आहे. त्या आधी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये तासभर बैठक झाली. बैठकीत महाविकास आघाडीत काहीसा नाराज असलेल्या काँग्रेस पक्षाशी संवाद वाढवण्यावर भर देण्यात आल्याचं बोललं जातंय. या आधी महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याच वारंवार बैठका होत होत्या. त्यामुळे काँग्रेसकडे दूर्लक्ष होतंय का अशी चर्चाही राजकिय वर्तुळात सरू होती. सध्या राजस्थानात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे काँग्रेसची नाराजी दूर करण्याची प्रयत्नं सुरू असल्याची माहीती मिळतेय. बापरे! पेट्रोल दिलं नाही म्हणून ऑफिसमध्ये सोडले कोब्रा नाग, पाहा धक्कादायक VIDEO या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. मुंबई, पुण्यात होता बॉम्बस्फोटांचा कट, ISKPच्या दहशतवादी योजनेचा झाला पर्दाफाश गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची नाराजी असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे प्रश्न तातडीने सुटावेत आणि नाराजी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात कोरोनाचं संकट असताना नवं राजकीय संकट येऊ नये यासाठीही शिवसेनेचे शिलेदार कामाला लागले असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Sharad pawar, Uddhava thackeray

पुढील बातम्या