राजस्थाननंतर भाजपच्या रडावर महाराष्ट्र, उद्रेक टाळण्यासाठी नेत्यांची धडपड

राजस्थाननंतर भाजपच्या रडावर महाराष्ट्र, उद्रेक टाळण्यासाठी नेत्यांची धडपड

शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्ता गेली याचं शल्य भाजपच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी भाजप शोधत आहे.

  • Share this:

मुंबई 14 जुलै: मध्यप्रदेशमधली सत्ता गेल्यानंतर आता राजस्थानातलं काँग्रेस (Rajasthan Government) सरकार डळमळीत झालं आहे. राजस्थानमध्ये बहुमत असतानाही काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमधल्या अंतर्गत कलहामुळे सरकारचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे भाजप (BJP) नेत्यांना बळ मिळालं असून आता पुढचं टार्गेट महाराष्ट्र (Maharashtra Government)) असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचं एकत्र असलेले महाविकास आघाडी सरकार देखील पुढच्या काळामध्ये अस्थिर होऊ नये म्हणून महाविकासआघाडीच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. तर पक्षात कलह वाढू नये म्हणून काँग्रेस (Congress) नेते खबरदारी घेत आहेत.

देशात काँग्रेस पक्षांतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी कलह सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी यांनी थेट हातात घेण्याच्या आधीच कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये दोन प्रमुख नेत्यांमध्येच वाद सुरू झाला आहे. या वादामुळे राजस्थान सरकार अस्थिर झालं आहे.

त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेते जास्त खबरदारी घेत आहेत. खासकरून काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये आणि आमदारांमध्ये नाराजी राहू नये म्हणून आता मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती आहे.

सचिन पायलटांवर कारवाई होताच भाजप झाली सक्रीय; गहलोतांनीही लावली 'फिल्डिंग'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीतल्या काही प्रमुख नेत्यांशी संवाद वाढला आहे. काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुख्यंत्र्यांसोबत बैठक करून काँग्रेस पक्षातील आमदाराची विकासकामे सांगत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला.

तर संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांनी संवाद वाढवावा त्यामुळे समस्या दूर होऊ शकतात असं म्हटलं होतं.

राजस्थानातल्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर शिवसेनेचे नेते सर्वात जास्त अस्वस्थ आहेत. काँग्रेस केव्हा काय भूमिका घेईल हे सांगता येत नाही. त्याच बरोबर सगळ्याच पक्षांमधल्या अस्वस्थ आमदारांवर भाजपचा डोळा आहे.

मनधरणी नाट्य संपले, अखेर सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्ता गेली याचं शल्य भाजपच्या जिव्हारी लागलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी तर मी पुन्हा येईन अशी घोषणाच केली होती. त्यामुळे तेही संधी मिळण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढत असतांनाच आता सरकार डळमळीत होणार नाही याचीही खबरदारी आघाडीच्या नेत्यांना घ्यावी लागत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 14, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading