मुंबई, 10 मे : राज्यावर कोरोनाचे (Maharashtra corona) संकट असताना राजकारण करू नका, असा सल्ला देत भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजप नेत्यांची कानउघडणी केली होती. पण, एक दिवस उलटत नाही तेच भाजप नेत्यांकडून ब्लेम गेम सुरूच आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen darekar) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर (MVA Goverment) टीकास्त्र सोडले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. 'ऑक्सिजन अतिरिक्त साठा मागणी सीएस यांनी केली. गुजरात जामनगर येथून अतिरिक्त साठा सुरू आहे. दीड हजार मेट्रिक टन राज्याला मिळतो. संपूर्ण राज्याला 10 प्लांट दिले पीएम रिलीफ फंड येथून पण एक ही प्लांट राज्य सरकारने उभा केला नाही नाही. केंद्र सरकारकडे वारंवार बोट दाखविण्यापेक्षा राज्य सरकार काय करत हे सांगा', अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; सहा जणांचा मृत्यू, आरोपीनं केली आत्महत्या
'ऑक्सिजन बाबत 200 मॅट्रिक टन अतिरिक्त साठा द्यावा अशी मागणी मुख्य सचिवांनी केली होती. दीड हजार टन ऑक्सिजन आता भेटत आहे. महाराष्ट्रात एकही ऑक्सिजन प्लांट उभा होत नाही हे सरकारचे अपयश त्यावर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे हे सांगत आहेत. महाराष्ट्रात रेमडेसीवीर उपलब्ध नाही, लसीकरण गोंधळ सुरू आहे राज्यात नियोजनाचा बोजवारा उडाला आहे आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे, असंही दरेकर म्हणाले.
तसंच, 'आजच्या सामनात टास्क फोर्सवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पण ही समिती केंद्र सरकारच्या मागणीनंतर नेमली आहे पण माहिती न घेता अग्रलेख लिहिला आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
त्यानंतर प्रवीण दरेकर आणि भाजपच्या शिष्टमंडळाने दुपारी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली.
VIDEO :क्रिकेट मॅचसाठी सगळे सज्ज, पोलिसांची गाडी आली अन्, शेकडो टू व्हीलर्स पसार
मुंबईत 227 वॉर्डमध्ये आम्ही लसीकरण केंद्र करू असं त्यांनी सांगितले आहे. पण या केंद्रावर लस कुठून येणार हे ते सांगू शकले नाही. आयुक्तांनी आम्हाला हे सर्व मुद्दे येत्या दोन दिवसात बघून सांगतो असे म्हटले आहे. वास्तव हे आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी दाखवले आहे. टेस्टिंग कमी करून रुग्ण संख्या दाबू नका. राज्यात एकीकडे तुम्ही आकडेवारी कमी होत आहे असे म्हणता तर दुसरीकडे सगळीकडे लॉकडाऊन करणे हे विरोधाभासी आहे., अशी टीका दरेकर यांनी केली.
तुम्ही चांगले काम करा आम्ही तुमचे कौतुक करू. सगळं काही आलबेल आहे. अश्या भ्रमात गेलात तर सगळे संपेल. राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले त्याचे काय झाले हे पाहिले. आता मुंबई महापालिका काढतो असे म्हणतात बघू त्याचे काय व्हावे, असंही दरेकर म्हणाले.
का म्हणाले होते नितीन गडकरी?
'कोरोनाच्या काळात आपल्याला कार्यकर्ता गमावणे हे न परवडणारे आहे. अनेक कार्यकर्ते आपण आतापर्यंत गमावले आहे. पक्षाची कामं होत राहतील, पण तुमचा जीव वाचला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, पुढे अनेक कामं करता येईल. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या, ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लस घ्यावी, लोकांना लसीकरण केंद्रावर नेण्यास मदत करावी, कुणाचं झालं नाही, याची काळजी घ्यावी' अशी विनंतीही गडकरींनी केली.
'यात राजकारण करू नये, आपण सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. लोकांना माहिती आहे. यावेळी लोकांना आपण राजकारण केलं तर लोकांना हे आवडणार नाही. तुम्ही जे काही चांगले काम केले, ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. त्याचे क्रेडीट आपोआप तुम्हाला आणि पक्षाला मिळणार आहे' असं म्हणत गडकरी यांनी नेत्यांना खडेबोल सुनावले.
'आपण जे काम करतोय, ते वृत्तपत्र, सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतच आहे. आपण जे करतोय, त्याची माहिती लोकांना मिळणे याचा बागुलबुवा करणे हे योग्य नाही. मी फोटो पाहिलेत की, एका ठिकाणी एकच ऑक्सिजन सिलेंडर देत असताना चार जण फोटो काढून शेअर करत आहे, असं काही करू नका. आपल्याबद्दलची प्रतिमा ही वाईट होईल, असंही गडकरींनी कार्यकर्त्यांनी बजावले.
'आपण नेहमी सांगत आलोय, 'मनसा सततम् स्मरणीयम्. वचसा सततम् वदनीयम्. लोकहितम् मम करणीयम्', म्हणजे, राजकारण हे सत्ताकारण नाहीये. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे, हे खरं राजकारण आहे. नुसत्या निवडणुका लढवणे आणि सत्तेत जाणे एवढंच त्याचा हा भाग नाही' असंही गडकरी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.