न्यू इअरची पार्टी ठरली अखेरची, आंघोळ करताना गुदमरून 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

बाथरूममध्ये गुदमरून तरुणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या मुलुंड भागात घडला आहे. निपा गाला असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 09:29 AM IST

न्यू इअरची पार्टी ठरली अखेरची, आंघोळ करताना गुदमरून 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 03 जानेवारी: बाथरूममध्ये गुदमरून तरुणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या मुलुंड भागात घडला आहे. निपा गाला असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे. बाथरूममध्ये गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

आंघोळीदरम्यान गरम पाण्याच्या वाफेमुळं गुदमरून निफाचा मृत्यू झाला. बराच वेळ ती बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या घरच्यांनी दरवाजा तोडला आणि त्यानंतर या सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.

न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी निपा तिच्या मित्रांसह लोणावळ्याला गेली होती. बुधवारी ती घरी परतली. त्यानंतर ती अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. खूप वेळा झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून तिच्या पालकांनी दरवाजा ठोठावला. पण निपाने काहीच आवाज दिला नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी निपा बेशुद्ध अवस्थेत पडली होती.

तिला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत तिच्या मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading...

निपाच्या अशा अकाली जाण्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. निपा आपल्यात नाही आहे याचा अजून विश्वास तिच्या पालकांना होत नाही आहे. तर प्रत्येक अडचणीत सोबत असणाऱ्या तिच्या मित्र-मैत्रिणींनादेखील यामुळे मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण परिसरातूनही यावर शोक व्यक्त केला जात आहे.


CCTV VIDEO: प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अज्ञात असल्याचं सांगून मृतदेह ठेवला रुग्णालयात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...