मुंबई, 22 नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लीम असल्याचा दावा केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी अनेकदा मलिकांनी नवनवे पुरावे समोर आणण्याचा प्रयत्नही केला आहे. अशात आता मध्यरात्रीच नवाब मलिकांनी आणखी एक ट्विट (New Tweet of Nawab Malik) करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. मलिकांच्या ट्विटनंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे यांचे काही फोटो शेअर केलेत.
मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लीम असल्याचा दावा केला. त्यासंदर्भातले काही पुरावेही त्यांनी दिलेत. मात्र, समीर वानखेडे यांनी मलिकांचा हा दावा आतापर्यंत नेहमीच नाकारला आहे. त्याप्रमाणे आताही समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी काही फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा- IND vs NZ: युजवेंद्र चहलबाबत दिनेश कार्तिकनं केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला...
या फोटोमध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचे फोटो शेअर करुन हिंदू असल्याचा पुरावा दिला आहे. त्यांनी तीन फोटो शेअर केलेत.
त्यात पहिला फोटो समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या लग्नातला आहे.
दुसऱ्या फोटोत समीर वानखेडे सत्यनारायण पूजेच्या नमस्कार करतानाचा आहे.
तर तिसऱ्या फोटोत समीर वानखेडे कसली तरी पूजा करत असताना दिसून येत आहेत.
ज्ञानदेव वानखेडे यांनी हे फोटो शेअर करुन आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो असं म्हटलं आहे.
नवाब मलिकांचं मध्यरात्री ट्विट
नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून समीर वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये वानखेडे मुस्लीम वेशात दिसत आहेत. हा फोटो ट्विट करत त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये नवाब मलिक म्हणाले, कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे.
कबूल है, कबूल है, कबूल है... यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
त्या फोटोत वानखेडे लग्नातील खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या शेजारीच बसलेले एक गृहस्थ त्यांची काही कागदपत्रांवर सही घेताना दिसत आहेत. हे दोघंही मुस्लीम पोशाखात दिसत आहेत.
हेही वाचा- मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक
याआधीही नवाब मलिक यांनी निरनिराळे पुरावे सादर करत वानखेडे मुस्लीम असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वानखेडे यांच्या शाळेतील दाखलेही समोर आणले होते. यातील काही ठिकाणी त्यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे तर काही दाखल्यांवर समीर दाऊद वानखेडे असं होतं. काही ठिकाणी धर्म हिंदू तर काही ठिकाणी मुस्लीम लिहिला गेला होता. यानंतर मलिकांनी आता हा नवा फोटो ट्विट करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nawab malik