मुंबईनंतर आता ठाणे बनत आहे ‘हॉटस्पॉट’, 24 तासात सापडले 195 कोरोना रुग्ण

मुंबईनंतर आता ठाणे बनत आहे ‘हॉटस्पॉट’, 24 तासात सापडले 195 कोरोना रुग्ण

यामुळे ठाणे जिल्हयात 150 पेक्षा जास्त करोना बाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. त्यात आता वाढ होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

ठाणे 02 मे : ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 195 करोना बाधित रुग्ण आढळलेत. एकाच दिवसात ठाण्यात एवढ्या मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर ठाणे जिल्हयात आज 2 जणांचा करोना मुखे मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा हा रेड झोन मध्ये असून देखील आता आणखी काळजी ठाणे जिल्हा वासियांनी घेणे गरजेचे आहे असं सांगितलं जात आहे. ठाणे जिल्ह्यात आता करोना बाधितांची संख्या 1 हजार 206 इतकी झाली आहे. तर ठाणे जिल्हयात आत्तापर्यंत करोनामुळे 31 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

यामुळे ठाणे जिल्हयात 150 पेक्षा जास्त करोना बाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. त्यात आता वाढ होण्याची शक्यता आहे. तर आनंदाची बाब म्हणजे सतत गजबलेले आणि दाटीवाटीचे शहर उल्हासनगर मध्ये आजही नवीन करोना बाधित रुग्ण आढळला नाही.

ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त 372 करोना बाधित ठाणे महानगर पालिका हद्दीत आढळलेत तर 69 जणांनी करोनावर मात केली असून 15 जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.

ठाणे मनपा पाठोपाठ नवी मुंबई मनपा हद्दीत 289 करोना बाधित आढळलेत तर 56 जणांनी करोनावर मात केली असून 5 जणांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे.

केडीएमसी मनपा हद्दीत 181 करोना बाधित आढळलेत तर 54 जणांनी करोनावर मात केली असून 3 जणांचा करोनामुळे  मृत्यू झाला आहे.

मिरा भाईंदर मनपा हद्दीत १६५ करोना बाधित आढळलेत तर ४५जणांनी करोनावर मात केली असून ३ जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.

हे वाचा -  VIDEO : लॉकडाऊन असतानाही सरकारी शाळेत घुसला सिंह, डरकाळीने हादरलं अख्ख गाव!

बदलापूर हद्दीत ३५ करोना बाधित आढळलेत तर ८ जणांनी करोनावर मात केली असून १ जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.

ठाणे ग्रामीण भागात ३१ करोना बाधित आढळलेत तर ४ जणांनी करोनावर मात केलीये तर २ जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.

भिवंडी मनपा मनपा हद्दीत १६ करोना बाधित आढळले आहेत.

अंबरनाथ भागात १० करोना बाधित आढळले तर ३ जणांनी करोनावर मात केली असून १ जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.

हे वाचा - चीनसारखचं मुंबईत 15 दिवसांमध्ये उभं राहणार 1,000 खाटांचं COVID-19 हॉस्पिटल!

उल्हासनगर मनपा मनपा हद्दीत ९ करोना बाधित आढळलेत तर १ जणांनी करोनावर मात केलीये... तर १ जणांचा करोना मुळे  मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्हयात आतापर्यंत ७ हजार ९६६ जणांची कोविड १९ चाचणी करण्यात आलीये यांत ५ हजार ७३२ जणांची चाचणी निगेटिव्ह आलीये. आनंदीची बाब म्हणजे आतापर्यंत एकूण २४० जण असे आहेत ज्यांनी कोविड वर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

 

First published: May 2, 2020, 10:53 PM IST

ताज्या बातम्या