Good News: राज्यात कोरोना रुग्णांमध्ये निच्चांकी घट, नव्या बाधितांची संख्या 3 हजारांपेक्षा कमी

Good News: राज्यात कोरोना रुग्णांमध्ये निच्चांकी घट, नव्या बाधितांची संख्या 3 हजारांपेक्षा कमी

राज्यात आत्तापर्यंत 17,61,615 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा Recovery rate हा 93.54 टक्के झाला आहे.

  • Share this:

मुंबई 14 डिसेंबर: कोरोनाशी निकराची झुंज देणाऱ्या राज्याला दिलासा मिळाला आहे. अनेक आठवड्यानंतर पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या निच्चांकी पातळीवर आलीय. सोमवारी दिवसभरात 3 हजारांपेक्षारी कमी म्हणजे 2,949 नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18,83,365 एवढी झालीय. तर दिवसभरात 4,610 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आत्तापर्यंत 17,61,615 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा Recovery rate हा  93.54 टक्के झाला आहे. तर 60 जणांचा मृत्यू झाला.

पुण्यात दिवसभरात 196 नव्या रुग्णांची वाढ झाली तर 257 जणांना डिस्चार्ज मिळाला. दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाला. विविध रुग्णालयांमध्ये सध्या 386 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात 224 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

देशातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 98.84 लाख झाला आहे. त्यातले 93.87 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.43 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3.51 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 13 डिसेंबरला एकाच दिवसात 76 हजार 363 उपचाराधिन रुग्णांना घरी सोडण्यात आलं होतं.

मुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, असं असलं तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. मुंबईचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी एक इशारा दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल, असं आयुक्तांनी सांगितलं आहे.

आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितलं की, मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते.

लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 14, 2020, 7:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या