S M L

विधानसभेसाठी काँग्रेसला हवी मनसेची साथ, लोकसभेच्या निकालानंतर होणार निर्णय!

लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील हायकमांडसोबत बैठक होणार.

सागर कुलकर्णी सागर कुलकर्णी | Updated On: May 13, 2019 07:48 AM IST

विधानसभेसाठी काँग्रेसला हवी मनसेची साथ, लोकसभेच्या निकालानंतर होणार निर्णय!

मुंबई, 12 मे: लोकसभेचे निकाल २३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करून मुंबई व महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील हायकमांडसोबत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंझावती प्रचारामुळे किती मते मिळाली याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी विधानसभेला राज यांच्या मनसेसोबत आघाडी करावी का, याबाबत खल होणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे नेमका किती मतात फायदा झाला, याचा ऊहापोह केला जाईल त्यानंतर त्यांना सोबत घ्यायचे का यावर हायकमांड सोबत प्राथमिक चर्चा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला मनसे सोबत घ्यावे अशी भूमिका घेतली होती. पण तेव्हा काँग्रेसमधील नेते अशोक चव्हाण, संजय निरूपम यासह काही नेत्यांनी मनसेला सोबत घेण्यास विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत बिहार उत्तर प्रदेशात उत्तर भारतीय विरोधात राज ठाकरे यांची भूमिका आघाडी केल्यास फटका बसेल अशी शंका या काँग्रेस नेत्यांना होती, त्यामुळे राज ठाकरे थेट सहभागी न होता अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी मदतच केली.

आता लोकसभा निकाल नंतर नेमका मनसे फायदा किती झाला याचा उहापोह केला जाणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सोबत मनसे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काँग्रेस वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अर्थात या सर्व निर्णय काँग्रेस हायकमांड अर्थात राहुल गांधीच घेतील असे त्यांनी आवर्जून नमूद केले.


..तर मनसेचं 'इंजिन' 'घड्याळा'च्या काट्यावर धावणार!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक चर्चा कोणाची झाली असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची होय. लोकसभा निवडणूक न लढवता राज यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा एक भाग असेल असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. अर्थात राज यांनी त्याआधीच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. राज्यात या वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे होते. पण राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना केलेला विरोध यामुळे काँग्रेसने त्यास नकार दिला होता. असे असले तरी राज यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध प्रचार केला होता. मुंबईतील एका सभेत तर त्यांनी शिवसेनेला देखील मत देऊ नका, असे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणुकीत राज सोबत असल्यास त्याचा फटका उत्तर भारतात बसू शकतो, असे काँग्रेस नेत्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेण्यास नकार दिला होता. पण आगामी विधानसभा निवडणुकीत असा कोणताही मुद्दा असणार नाही, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने याआधी सांगितले होते.

विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतून राष्ट्रवादी त्यांच्या वाट्याला आलेल्या काही मनसेला देण्याची शक्यता आहे. मनसेच्या मते राज्यातील 30 मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसू शकतील.

अशी आहे विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी

मनसेला 2009च्या विधानसभा निवडणुकीत 13 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा मनसेने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मतदारसंघात विजय मिळवला होता. 2009च्या विधानसभेत राज यांनी शिवसेना आणि भाजपची मते घेतली होती. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता मिळाली होती. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास 2009मध्ये काँग्रेसने 21.01, राष्ट्रवादीने 16.37 आणि मनसेने 5.71 टक्के मते घेतली होती.

पण त्यानंतर झालेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मोठा पराभव झाला होता. तेव्हा मनसेला केवळ एकच जागा मिळाली होती.


मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2019 07:48 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close