Home /News /mumbai /

‘लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबईत होऊ शकतात कोरोनाचे 50,000 रुग्ण’

‘लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबईत होऊ शकतात कोरोनाचे 50,000 रुग्ण’

Mumbai: Doctors wearing protective suits check residents with an electronic thermometer inside a slum in Worli during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus in Mumbai, Friday, April 17, 2020. (PTI Photo)
(PTI17-04-2020_000165B) *** Local Caption ***

Mumbai: Doctors wearing protective suits check residents with an electronic thermometer inside a slum in Worli during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus in Mumbai, Friday, April 17, 2020. (PTI Photo) (PTI17-04-2020_000165B) *** Local Caption ***

मात्र 3 मेनंतर जर लॉकडाऊन हटविण्यात आलं तर पुन्हा सगळे कामावर परत जातील आणि कोरोनाचा झपाट्याने प्रसार होईल.

    मुंबई 20 एप्रिल: कोरनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात देशातले सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात मुंबई हॉटस्पॉट ठरलं आहे. लॉकडाऊनमुळे सगळे आता घरात बंद आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यशही आलं आहे. पण लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. एकट्या मुंबईतच कोरोनाचे 50 हजार रुग्ण होतील अशी भीती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली आहे. सध्या लॉकडाऊन आहे सर्वत्र शांतता आहे. मात्र 3 मेनंतर जर लॉकडाऊन हटविण्यात आलं तर पुन्हा सगळे कामावर परत जातील आणि ही संख्या वाढू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट करून रुग्णांना आयसोलेट करा आणि उपचार करा असा सल्लाही दिला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून संख्याही तब्बल  4483 वर पोहोचली आहे. राज्यात आज सकाळी 11 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच हा आकडा 5000 पार करेल अशी भीती आहे.  सकाळपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात  283 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई पालिकेच्या हद्दीतील आहे. मुंबईत 187 रुग्ण आढळले आहे. हे वाचा - डॉक्टर आणि पोलिसांनंतर पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात, मुंबईत 53 जणांना लागण मुंबईपाठोपाठ वसई विरार 22, ठाणे 21, कल्याण डोंबिवली 16,  भिवंडी 1, मीरा भाईंदर 7, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेल 6, पिंपरी चिंचवड 9, रायगड 2, सातारा 1 आणि सोलापूरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. पुणे 8 दिवसांसाठी सील दरम्यान, पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे आठ दिवस पुण्यात पू्र्ण संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीच्या काळात कुणी बाहेर आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहे. पुढील आठ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी  शहरातील दुकानेही फक्त 2 तास खुली राहणार आहे.  शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 100 टक्के संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. हेही वाचा -रिलायन्स फाउंडेशनचे जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17265 वर भारतात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 17 हजारांच्या पुढे गेली आहे. आतपर्यंत 2302 लोक बरे झाले आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. यासह देशातील कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 17265 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 543 वर पोहोचला आहे.  गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 1553 नवी प्रकरणं समोर आली असून 36 जणांना देशभरात मृत्यू झाला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या