मुंबईत रेल्वेचे पादचारी पूल आता अनिवार्य, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

मुंबईत रेल्वेचे पादचारी पूल आता अनिवार्य, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

रेल्वेचे पादचारी पूल आता सुविधा म्हणून नव्हे तर ते अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या बैठकीत घेण्यात आला.

  • Share this:

30 सप्टेंबर : रेल्वेचे पादचारी पूल आता सुविधा म्हणून नव्हे तर ते अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या बैठकीत घेण्यात आला.

रेल्वेच्या इतिहासातील दीडशे वर्षांत पादचारी पूलाला प्रवाशी सुविधा असा दर्जा दिला होता. आता पादचारी पुलाला अनिवार्य दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकावर सरकते जिने लावण्याला मान्यता दिली आहे.

आज केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली होती. मुंबईतल्या रेल्वे सुरक्षे विषयीचे सर्व अधिकार रेल्वेचे महाव्यवस्थापकांना देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीला जावं लागणार नाही.

First published: September 30, 2017, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading