मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दिवाळीनंतर भाजपमध्ये फुटणार फटाके, 15 ते 20 नगरसेवक करणार सेनेमध्ये प्रवेश?

दिवाळीनंतर भाजपमध्ये फुटणार फटाके, 15 ते 20 नगरसेवक करणार सेनेमध्ये प्रवेश?

'20 भाजप नगरसेवक हे डिसेंबर महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला ते कंटाळून गेले आहे'

'20 भाजप नगरसेवक हे डिसेंबर महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला ते कंटाळून गेले आहे'

'20 भाजप नगरसेवक हे डिसेंबर महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला ते कंटाळून गेले आहे'

सुस्मिता भदाणे पाटील, प्रतिनिधी

मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबई महापालिकाची निवडणुकीच्या (mumbai municipal corporation) निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने मिशन मुंबई हातात घेतले आहे. पण, शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी (yashwant jadhav) भाजपचे ( BJP corporators will join Shiv Sena ) 15 ते 20 नगरसेवक डिसेंबर महिन्याच्या आधी सेनेत (shivsena) प्रवेश करतील, असा दावा करून एकच धुरळा उडवून दिला आहे. भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून जोरदार बचाव सुरू झाला आहे.

यशवंत जाधव यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी सत्ताधारी विरूद्ध भाजप असे चित्र पहायला मिळाले आहे. 15 ते 20 भाजप नगरसेवक हे डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणुकीत जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला ते कंटाळून गेले आहे. डिसेंबरमध्ये धमका पहायला मिळेल  असा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशंवत जाधव यांनी केला आहे.

उत्तरपत्रिका पाहून शिक्षक कोमात; असं काय लिहिलंय विद्यार्थ्याने तुम्हीच पाहा

25 वर्षे मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार होते. 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना महानगरपालिकेत विभक्त झाले त्यानंतर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपद हे केवळ काँग्रेसकडे आहे त्यामुळे भाजपाचा विरोधी पक्षनेताच नाही.

2017 ला मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आता यशवंत जाधव यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पालिकेवर शिवसेना  झेंडा फडकावायला हवा म्हणून स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपकडून वारंवार शिवसेनेवर भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या आरोपांचे हल्ले होत आहे. शिवसेनाही याचंच प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. पण सेनेचा हा बार फुसका निघेल असा भाजपचा दावा आहे.

भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. गेले 25 वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत याची आठवण करून देत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत असा सणसणीत टोला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सत्ताधार्‍यांना लगावला.

मी आमदार आहे..', भर बैठकीत रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी, VIDEO

तर, यशवंत जाधव यांनी सेना महापालिका निवडणूक महाआघाडी करायची भाषा केल्याने सेनेचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहे. भाजपाचा एक कार्यकर्त्या जाणार नाही नगरसेवक तर लांब. विशेष म्हणजे यशवंत जाधव निवडणूक आधी नगरसेवक कोण कोठे जाते तो पर्यंत तुम्ही आत जाता का बाहेर राहता याचा विचार करा असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी

यशवंत जाधव यांना लगावला आहे.

मुंबई महापालिकेत शंभरपार जागा जिंकण्यासाठी शिवसेनेने घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात मोट सुरूवात झाली आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97

भाजप – 83

काँग्रेस – 29

राष्ट्रवादी – 8

समाजवादी पक्ष – 6

मनसे – 1

एमआयएम – 2

अभासे – 1

एकूण – 227

बहुमताचा आकडा – 114

First published:

Tags: BJP, Shivsena