मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

एकनाथ खडसे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 02 जून: माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओके येथे जाऊन भेट घेतली. एक दिवसाआधीच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुक्ताईनगरचा दौरा केला होता. त्यानंतर आज खडसे पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होते, असे खडसे यांनी सांगितलं. तसंच,  यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत हे सुद्धा उपस्थितीत होते. विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आले होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर गेले होते. यंदा देशात समाधानकारक पाऊस; दुष्काळाची शक्यता कमीच,हवामान खात्याचा सुधारित अंदाज मुक्ताईनगरमध्ये जाऊन त्यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे  वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. त्यानंतर आज सकाळी एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते.  त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
First published:

पुढील बातम्या