अजितदादा यांच्या पाठोपाठ आणखी एका खासदाराला कोरोनाची लागण

अजितदादा यांच्या पाठोपाठ आणखी एका खासदाराला कोरोनाची लागण

खासदार सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे (NCP) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनाही कोरोनाची लागण (Corona Test) झाल्याचे समोर आले आहे. उपचारासाठी सुनील तटकरे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खासदार सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. सुनील तटकरे यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता याच हॉस्पिटलमध्ये तटकरे यांनाही दाखल करण्यात आले आहे.

सामान्यांना मोफत मिळू शकतं धान्य आणि रोखरक्कम, तिसऱ्या पॅकेजच्या तयारीत सरकार

'सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद यांच्या बळावर लवकरात लवकर पुन्हा सेवेत रुजू होईन', असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले आहे.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली होती. तसंच,  'राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन' असंही अजित म्हणाले.

पुढील 4 दिवसात बदलणार LPG घरगुती गॅस सिलेंडरबाबतचा हा नियम, वाचा सविस्तर

याआधीही राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यानंतर धनंजय मुंडे यांचाही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली.

Published by: sachin Salve
First published: October 27, 2020, 11:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या