पराभवानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; बैठकीला नेत्यांची दांडी

पराभवानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद संतपाना दिसत नाहीत.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 10:59 AM IST

पराभवानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; बैठकीला नेत्यांची दांडी

मुंबई, सागर कुलकर्णी, 25 मे : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी पाठ फिरवली. पराभवावर विचारमंथन करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर या पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवली. मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. तर, एकनाथ गायकवाड हे एकमेव नेते या बैठकीला हजर होते.

संजय निरूपम नाराज

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय निरूपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे संजय निरूपम नाराज होते. शिवाय, निवडणुकीच्या काळात देखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली होती. त्याचा परिणाम हा निकालांवर देखील झाला.


काँग्रेसच्या 3 नेत्यांनी सांगितलं पक्षाच्या मानहानीकारक पराभवाचं खरं कारण

Loading...

काँग्रेसचा दारूण पराभव

लोकसभा निवडणुकीमध्ये देशासह राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईमध्ये देखील काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेलेली नाही. केवळ पंजाबमध्ये काँग्रेसनं 8 जागा जिंकल्या. देशाचा विचार करता काँग्रेसला 100 जागा जिंकणे देखील कठिण झाले.

राहुल गांधी देणार राजीनामा?

अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पहिलीच निवडणूक लढवली होती. शिवाय, त्यांना बहिण प्रियांका गांधी यांची देखील साथ मिळाली होती. पण, त्यानंतर देखील काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी ( आज ) होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे.


माजी आमदाराच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 10:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...