ठाणे, 25 डिसेंबर : ठाण्यातल्या पाचपाखाडीतील आंबेडकर रोड परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामधे दुमजली इमारत कोसळली. या स्फोटात 5 जण जखमी झालेत. यात कोणतीही जीवितहानी नाही मात्र 3 महिला आणि एका मुलासह 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.