Home /News /mumbai /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांनाही धमकीचे फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांनाही धमकीचे फोन

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले आहेत.

मुंबई 07 सप्टेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा फोनही भारताबाहेरून आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले आहेत. या फोन प्रकरणाची चौकशी आता सुरक्ष यंत्रणा करत आहेत. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत.  त्यांची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती पुढे आली होती पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत. हे वाचा - सुशांतच्या दिलं होतं विष? गळ्यावरील खुणेमुळे व्हिसेरा रिपोर्ट पुन्हा तपासणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री 11च्या सुमारास 4 फोन काॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आॉपरेटरने घेतले होते. त्यानंतर मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढिण्यात आली  होती.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Sharad pawar, Uddhav tahckeray

पुढील बातम्या