अमिताभ नंतर आता अक्षय कुमारनं केलं 'मेट्रो'चं कौतुक Video व्हायरल!

अक्षय कुमार ने घाटकोपर ते वर्सोवा असा प्रवास केला. ट्रॅफिक मध्ये 2 तास लागणार असं मॅपमध्ये बघितल्यावर मेट्रो ने प्रवास केल्याचं अक्षयने म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 08:50 PM IST

अमिताभ नंतर आता अक्षय कुमारनं केलं 'मेट्रो'चं कौतुक Video व्हायरल!

मुंबई 18 सप्टेंबर : मुंबईतल्या आरे कॉलनित प्रस्तावित असलेल्या मेट्रो कार शेडला जोरदार विरोध होतोय. पर्यावरणाच्या दृष्टिने इथं झाडांची कत्तल होऊ नये असं आरे बचाव समर्थकांचा युक्तिवाद आहे. तर आरेतल्या जागेशिवाय दुसरी योग्य जागा नसल्याचा युक्तिवाद केला जातोय. या पार्श्वभूमीवर  बीग बी अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी एक ट्विट करून मेट्रोचं समर्थन केलं होतं. त्यानंतर आज अभिनेते अक्षय कुमार यांनी मेट्रोने प्रवास करत आपला अनुभव सांगितलाय. अक्षय कुमार ने घाटकोपर ते वर्सोवा असा प्रवास केला. ट्रॅफिक मध्ये 2 तास लागणार असं मॅपमध्ये बघितल्यावर मेट्रो ने प्रवास केल्याचं अक्षयने म्हटलं आहे. मेट्रोत बसल्यावर अक्षयने व्हिडिओ तयार करून तो ट्विट केलाय. अक्षयच्या या ट्विटमुळे मेट्रो प्रशासनाला बळ मिळण्याची शक्यता आहे.

VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय? आदित्य ठाकरेंनी केला गंभीर आरोप

मुंबईतील आरे वाचवण्यासाठी माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश सरसावलेत. कारशेडसाठी पर्यायी जागा असतानाही सरकारनं प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याची टीका रमेश यांनी केलीय. आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेनं यापूर्वीचं विरोध केलाय. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत या मुद्यावरुन भाजपची कोंडी होणार आहे. मंगळवारी त्यांनी आरे कॉलनित जावून घटनास्थळी भेट दिली.

Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... प्रदीप शर्मांनी स्वतः सांगितला किस्सा

Loading...

राष्ट्रीय हरित लवादाने आरेमधील मेट्रो 3 च्या कारशेडला मंजुरी दिली होती. जुलै 2015 पासुन या प्रकरणावर लवादासमोर सुनावणी सुरु होती. मे मध्ये याबाबत  लवादाने कोणत्याही प्रकारच्या कामाला स्थगिती देत जैसे थे चा आदेश दिला होता. वनशक्ती ही एनजीओ सातत्यानं या डेपो बांधकामचा विरोध करत राष्ट्रीय हरित लवादापुढे गेली होती. स्थानिक लोकांनीही वनशक्ती एनजीओला पाठींबा दर्शवला होता.  2298 झाडांची कत्तल होणार असल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेनही या  डेपोला विरोध दर्शवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...