हॉटेल मालकांकडून ग्राहकांची लूट, 5टक्के जीएसटी करूनही बिलात बदल नाही

हॉटेल मालकांकडून ग्राहकांची लूट, 5टक्के जीएसटी करूनही बिलात बदल नाही

GSTचे दर कमी होऊनही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सामान्यांना फायदा मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. राज्य सरकारने याविरोधात मोहीम सुरू केली आहे.

  • Share this:

रफिक मुल्ला, मुंबई, 17 नोव्हेंबर : GSTचे दर कमी होऊनही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सामान्यांना फायदा मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. राज्य सरकारने याविरोधात मोहीम सुरू केली आहे. मात्र खुल्या वस्तूंवर कोणत्याच विभागाचे नियंत्रण नसल्याने हॉटेलचालक मनमानी करताना दिसताहेत. या विरोधात वैध मापनशास्त्र विभाग म्हणजेच शासन ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहे.

हॉटेलमधील खाद्य पदार्थावर GST 18 वरून 5 टक्के झाला आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला पण प्रत्यक्षात अनेक हॉटेल्समध्ये सामान्य ग्राहक लुटला जातोय..

सर्व स्थरावरील अश्याच तक्रारींची दखल घेऊन राज्य सरकारच्या विविध विभागांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे. तसंच काही सूचनाही करण्यात आल्यात.

हाॅटेल्ससाठी सूचना

टॅक्स कमी झाला म्हणून दरपत्रक वाढवून अधिकचे दर लागू केले जाऊ नयेत, MRP वर टॅक्स लागू शकत नाही, त्यामुळे जुन्या कर कक्षेत असलेले दर बदलावेत,जुन्या मालावर नव्या दरानुसार स्टिकर लावावेत, GST नंबर दर्शनी भागात लावला जावा.

वैध मापन विभाग असो की GST, सुट्या वस्तूचे दर किती असावेत यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यावर नियमबाह्यरित्या कर लावल्यास मात्र कारवाई करू शकते. त्यामुळे या मुद्द्यावर धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

First published: November 17, 2017, 11:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading