Home /News /mumbai /

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप भोवले, मुंबई पोलिसांनी केली दिल्लीतील वकिलाला अटक

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप भोवले, मुंबई पोलिसांनी केली दिल्लीतील वकिलाला अटक

विभोर आनंदने सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सॅलिअन आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या एका वकिलाला चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीतील वकील विभोर आनंदला मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेनं अटक केली आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, विभोर आनंद हा स्वत: वकील असल्याचं सांगत आहे. विभोर आनंदने सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सॅलिअन आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांचा संबंध जोडणाऱ्या वक्तव्याचा एक व्हिडिओ यु्ट्यूबवर पोस्ट केला होता. दिशा सॅलिअनने आत्महत्येपूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, असा दावा विभोर आनंदने केला होता. एवढंच नाहीतर या विभोर आनंदने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची नावं सुद्धा घेतली होती. कोविड योद्धा मोहम्मद आरिफ यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती भवनाकडून 2 लाखांची मदत विभोर आनंदला मुंबई पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले होते. त्यानंतर गुरुवारी त्याला मुंबई आणण्यात आले आहे. विभोर आनंद हा सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी वाटेल तशा पोस्ट लिहित होता. त्याला न्यायालयाने तंबी सु्धा दिली होती. पण आनंदकडून हे प्रकार सुरूच होते. अखेर मुंबई पोलिसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या पसरविणे आणि विद्वेशक पोस्ट करणे यावर असल्याचे सांगितले जात आहे. दिशा सालियनने मुंबईतील मालाडच्या एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या ईमारतीमध्ये तिचा होणारा नवरा राहत होता. 'सीबीआय तपास थांबवणार नाही' दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करत असलेली केंद्रीय संस्था CBI लवकरच ही केसं बंद करणार आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात CBI ला काहीही काळंबेरं आढळून आलेलं नाही आणि सुशांतने आत्महत्याच केली या निष्कर्षापर्यंत तपास आल्याने आता लवकरच केस बंद होणार, या अर्थाच्या बातम्या दिवसभर अनेक माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. काय आहे यातलं तथ्य? केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) या बातम्यांची दखल घेत स्वतःच या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. मोठी बातमी! ड्रग प्रकरणात विवेक ओबेरॉयच्या अडचणीत वाढ, CCB करणार पत्नीची चौकशी सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या या खऱ्या नसून अफवा आहेत. CBI या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही तो थांबवलेला नाही. कुठल्याही निष्कर्षापर्यंत अद्याप आम्ही पोहोचलेलो नाही. त्यामुळे यांदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. सीबीआय तपासाबद्दलच्या आणि निष्कर्षाबद्दलच्या बातम्या अफवा आहेत, असं निवेदन CBI ने दिलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या