S M L

जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना २२ वर्षीय तरुणाला कार्डियाक्ट अरेस्ट, VIDEO व्हायरल

अदनानवर सध्या साबो सिद्दीकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2018 04:19 PM IST

जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना २२ वर्षीय तरुणाला कार्डियाक्ट अरेस्ट, VIDEO व्हायरल

मुंबई, २१ जुलैः अदनान मेनन या २२ वर्षीय मुलाचा जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना अचानक तो खाली कोसळला. ७ जुलैला त्याला मसल अॅण्ड माईंड या जिममध्ये कार्डियाक्ट अरेस्ट आला. जिममधील सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्यायाम करताना ब्रेन हॅमरेज झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अदनानवर सध्या साबो सिद्दीकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अदनान हा क्रॉफर्ड मार्केट परिसरात राहतो. तो नेहमीप्रमाणे ७ जुलैला मुंबई सेंट्रल येथील मसल अॅण्ड माईंड या जिममध्ये व्यायामाला गेला होता. मात्र व्यायाम करतानात तो खाली कोसळला. इतर सहकाऱ्यांनी तातडीने त्याला जवळच्या साबो सिद्दीकी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, त्याला कार्डियाक्ट अरेस्ट आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर त्याला ब्रेन हॅमरेजही झाले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.कार्डियाक्ट अरेस्ट आला तर काय करावेः

मुळात कार्डियाक अरेस्ट कोणत्याही वयात येऊ शकतो. त्यामुळे जिम करताना ट्रेनरचा सल्ला घेणे अत्यंत आवश्य आहे.

अनेकदा कार्डियाक अरेस्ट आला तर काय करायला हवे याचे ज्ञान लोकांना नसते.

Loading...
Loading...

अशावेळी त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवून त्याला कृत्रिम श्वास द्यावा.

यामुळे त्या व्यक्तीला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि त्याने ब्रेन हॅमरेज होत नाही

कार्डियाक अरेस्ट हा अनुवंशिकही असतो. अनेकांना आपली मेडिकल हिस्ट्री माहित नसल्यामुळे ते अशा गोष्टींपासून अनभिज्ञ राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 02:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close