मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचं नवं पाऊल

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचं नवं पाऊल

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्ण आढळून येत असून याबाबत महत्त्वाचं निरीक्षण समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून : मुंबईतील धारावी आणि वरळी भागात युद्धपातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा कहर रोखण्यात यश आलं. मात्र अजूनही मुंबईतील झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्ण आढळून येत असून याबाबत महत्त्वाचं निरीक्षण समोर आलं आहे.

झोपडपट्टीमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव शौचालयमधून होत असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं. त्यानंतर एच पूर्व विभागातील 200 पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालयांमध्ये स्पर्श विरहित फुट पेडल टाइप सॅनिटायजर युनिट बसवण्यात आलं आहे. त्यामुळे या परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लालबाग बाजारामध्ये कडकडीत बंद

लालबागमधील बाजारात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने मार्केट बंद करण्यात आलं आहे. पालिकेच्या आदेशानंतर या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. एरवी मसाले खरेदी करणाऱ्यांची या भागात मोठी गर्दी असते. मात्र कोरोना रुग्ण आढळल्याने मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

मुंबईत अंधेरीत पूर्वेने 5000 रुग्णांचा आकडा पार केला आहे. अंधेरी पूर्व हा मुंबईतील पहिला प्रभाग आहे ज्यामध्ये 5 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, तर एस प्रभाग म्हणजेच भांडुप, विक्रोळी, काजूरमार्ग पवई या भागात 4000 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. मुंबईत एकूण 5 वॉर्डात 4 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

First published: June 27, 2020, 7:26 PM IST

ताज्या बातम्या