• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मित्राच्या बर्थ डे पार्टीला चालला होता आदित्य, पण वळणावर घडले भीषण आणि...

मित्राच्या बर्थ डे पार्टीला चालला होता आदित्य, पण वळणावर घडले भीषण आणि...

आदित्य भोईर हा कल्याण येथील बालक विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकत होता.

  • Share this:
भिवंडी, 04 ऑक्टोबर : कॉलेजमधील मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अन्य मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना एका धोकादायक वळणावर दुचाकी घसरून अपघात झाल्याने अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुरबाड रोडवरील जांभुळपाडा येथे घडली आहे. तर सहकारी मित्र गंभीर जखमी झाला आहे. आदित्य संतोष भोईर (वय 17, रा.पिंपळघर ,ता.भिवंडी ) असं दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेल्या कॉलेज युवकाचे नाव आहे. मित्राचा वाढदिवस जीवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलींना चांगले संस्कार दिले तरच बलात्काराच्या घटना थांबतील, भाजप नेत्याचे वक्तव्य आदित्य भोईर हा कल्याण येथील बालक विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी आदित्य हा अन्य दहा मित्रांसोबत दुचाकींवरून बारवी डॅम येथे चालला होता. मात्र, भरधाव दुचाकी जांभुळपाडा येथे एका वळणावर घसरून ती थेट नाल्यात पडली. त्यामुळे दुचाकी नाल्यातील दगडांवर आदळल्याने आदित्य याच्या छातीला, डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत अन्य मित्रांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारांचा विध्वंस, राऊतांनी आठवलेंना सुनावले या अपघाती मृत्यूची नोंद टिटवाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वयाच्या अवघ्या 17 वर्षी आदित्यचा अपघाती मृत्यूमुळे भोईर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आदित्यच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published: