मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी-आदित्य ठाकरे

मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी-आदित्य ठाकरे

सप्टेंबरचा महिना उजाडला तरी सगळे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे 'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' असं वक्तव्य ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट: मुंबई विद्यापीठाची निकालाची 31 ऑगस्टचीही डेडलाईन आता हुकली आहे. अजूनही 33 निकाल जाहीर होणं बाकी आहे. सप्टेंबरचा महिना उजाडला तरी निकाल जाहीर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे 'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' असं वक्तव्य ट्विटरवरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

'आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही. हा घोटाळा आहे की नाही, याची चौकशी कधी होणार?' असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यातही चौकशी, क्लीन चीट हातात तयार ठेऊन नाही झाली तर उत्तम असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने 6 सप्टेंबर नवी डेडलाईन जाहीर केली आहे. तर मंगळवारी पडलेला पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचा अजब दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 12:49 PM IST

ताज्या बातम्या