प्रत्येक दसरा मेळावा नवी दिशा देतो- आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य

प्रत्येक दसरा मेळावा नवी दिशा देतो- आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य

शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा असतो, त्यामुळं यंदाही ही परंपरा कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवीन दिशा देतील, असं सूचक वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलंय.

  • Share this:

डोंबिवली,26 सप्टेंबर: प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरेंनी डोंबिवलीत केलं आहे. खासदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या गरब्याच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली.

शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा असतो, त्यामुळे यंदाही ही परंपरा कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवीन दिशा देतील, असं सूचक वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलंय.

सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये काहीतरी बिनसल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यातूनच शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. दसरा मेळाव्याला याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

दरम्यान, या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह खुद्द आदित्य ठाकरेंनीही ठेका धरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 10:33 AM IST

ताज्या बातम्या