आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण?

युतीत राहून मोठ्या मास्तरांनी गुजरातीचे धडे पण गिरवायला लावले का? कुठे गेला मराठी माणसांचा न्याय हक्क? कुठे गेला मराठी बाणा आणि कणा?

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 05:21 PM IST

आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण?

मुंबई 02 ऑक्टोंबर : मुंबईत सर्वांच्या नजरा लागल्या आहेतं त्या वरळीकडे. ठाकरे घराण्याची पहिलीच व्यक्ती या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. शिवसेनेनं अतिशय पुढचा विचार करून आदित्य ठाकरेंचं लाँचिंग केलंय. गेल्या काही महिन्यांपासून तसा नियोजनबद्ध प्रचार करण्यात येतोय. आदित्य यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण वरळीत मोठे जाहीरातीचे फलक लावण्यात आलेत. ते फलक होते विविध भाषांमध्ये लावलेले 'कसं काय वरळी'चे. मोठ्या फलकावर आदित्य ठाकरेंचा फोटो मराठी भाषेसोबतच आणि तेलुगू, उर्दु, इंग्रजी आणि गुजराती मध्येही असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे या फलकांवरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.

'युती'च्या घटकपक्षांची 'या' 14 जागांवर बोळवण, भाजपला मिळणार 150 जागा!

धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. ते म्हणतात, सत्तेसाठी कायपण - 'कसं काय वरळी'चं रुपांतर 'केम छो वरळी'मध्ये झालंय? युतीत राहून मोठ्या मास्तरांनी गुजरातीचे धडे पण गिरवायला लावले का? कुठे गेला मराठी माणसांचा न्याय हक्क? कुठे गेला मराठी बाणा आणि कणा?

मराठी माणसांचा नारा देत शिवसेनेने राजकारणात एण्ट्री केली होती. अनेक वर्ष त्यांचा मराठी माणूस आणि मराठी भाषा हाच नारा होता. मात्र नंतर शिवसेनेची भूमिका सर्वसमावेशक झाली. इतर भाषिकांना तीव्र विरोध करण्याचं आंदोलन शिवसेनेनं मवाळ केलं. उत्तर भारतीयांबद्दलचाही त्यांचा रोष कमी झाली. त्यामुळे शिवसेनेला डिवचण्यासाठी मुंडे यांनी त्यांना मराठी बाण्याची आठवण करून दिलीय. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधलाय.

अरुण गवळींची मुलगी भायखळ्यात शिवसेनेला देणार का धक्का?

Loading...

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी 3 ऑक्टोंबरला वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते उपस्थीत रहाणार आहेत. त्याचबरोबर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखिल उपस्थित रहाणार असल्याची माहीती मिळतेय. महायुतीचं एकप्रकारे शक्ती प्रदर्शनच आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना केलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...