शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून युवासेनाप्रमुखांची मंत्रिपदी वर्णी लागणार

शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून युवासेनाप्रमुखांची मंत्रिपदी वर्णी लागणार

पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आदित्य ठाकरे यांची पर्यावरण किंवा उच्चशिक्षण मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई,30 डिसेंबर: युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे देखील घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरे कँबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आदित्य ठाकरे यांची पर्यावरण किंवा उच्चशिक्षण मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंनी फिरवली 'भाकरी', प्रस्थापितांना डावलले

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मोठे निर्णय घेतले आहेत. पक्षातील प्रस्थापितांना दूर करून नवीन चेहऱ्यांनी पसंती देण्यात आली आहे. यामध्ये मागच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या मंत्र्यांचाही समावेश असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेने दिग्गज आमदारांना वगळले. जे माजी मंत्री देखील होते. त्यात दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, रवींद्र वायकर, दीपक केसरकर यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना संधी देण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेतील फक्त आमदार अनिल परब यांनाच मंत्रिमंडळासाठी अधिकृत फोनवरून निरोप देण्यात आलाा आहे. तसेच जे दिग्गज आमदार मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते, त्यांना अद्यापही निरोप देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत मोठे बदल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारात सत्तेची भाकरी फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना 13, राष्ट्रवादी 13 आणि काँग्रेसच्या 10 मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम हाेणार असून त्याच्या तयारीसाठी रविवारी दिवसभर राजशिष्टाचार विभागाकडून लगबग सुरू होती.

शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ:

गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, अनिल परब, शंभूराजे देसाई, उदय सामंत, बच्चू कडू, अब्दूल सत्तार, संदिपान भुमरे, राजेंद्र पाटील-येड्रावकर, शंकरराव गडाख.

दरम्यान, सोमवारी दुपारी 1 वाजता होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये, शिवसेनेच्या आमदारांना मंत्री म्हणून शपथविधी घेण्याचे आदेश स्वत: शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी नेमका कोणत्या मंत्र्यांना फोन गेला याबाबतची माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

नाशिक दोऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी रात्री आपल्या आमदारांना फोन करून सोमवारी मंत्री म्हणून शपथविधी घेण्याचे आदेश दिले आहे. रविवारपर्यंत शिवसेनेकडून मंत्री म्हणून कोण कोण शपथ घेणार याबद्दलची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. शिवसेनेचे अनेक आमदार मंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याने पक्ष प्रमुखांच्या निरोपाची वाट पहात होते. अखेर रात्री स्वत: उद्धव ठाकरे यांनीच प्रत्येक आमदारांशी थेट बोलून मंत्री पदाची शपथ घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे अधिकृत निरोप आलेल्या इच्छुक आमदारांचा जीव भांड्यात पडला. तर ज्यांना अधिकृत निरोप आलेला नाही अशा इच्छुक आमदारांची धाकधूक मात्र वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2019 10:15 AM IST

ताज्या बातम्या