Home /News /mumbai /

आता माफी नाही! आदित्य ठाकरेंनी सुचवले एकनाथ शिंदेंना शेवटचे 2 पर्याय

आता माफी नाही! आदित्य ठाकरेंनी सुचवले एकनाथ शिंदेंना शेवटचे 2 पर्याय

 इच्छा होती तर सांगायचं मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यांच्यावर राग नाही आता हसायला येतंय. सुरत, गुहावटी अशी धावपळ करत आहे

इच्छा होती तर सांगायचं मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यांच्यावर राग नाही आता हसायला येतंय. सुरत, गुहावटी अशी धावपळ करत आहे

इच्छा होती तर सांगायचं मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यांच्यावर राग नाही आता हसायला येतंय. सुरत, गुहावटी अशी धावपळ करत आहे

    विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 26 जून  : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आपलाच राहणार राहणार आहे. यांना दोनच पर्याय आहे. एकतर प्रहारमध्ये किंवा भाजपात विलीन होणे. पण यांना परत विधानभवनाची पायरी चढू द्यायची नाही. राजीनामे द्या आणि निवडणुकींना सामोर जा, असा सल्लावजा आव्हानच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)  एकनाथ शिंदेंना दिलं. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेकडून आक्रमकपणे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आमदार, पदाधिकारी आणि शिवसेना शाखाप्रमुखांचे मेळावे घेतले जात आहे. मुंबईत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिंदे आणि बंडखोर आमदारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. धनुष्यबाण हा आपलाच राहणार आहे, हे चिन्ह आपलेच राहणार आहे. यांना दोनच पर्याय आहे. एकतर प्रहारमध्ये किंवा भाजपात विलिन होणे. पण यांना परत विधानभवनाची पायरी चढू द्यायची नाही. राजीनामे द्या आणि निवडणुकींना सामोर जा, असा सल्लावजा आव्हानच आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं. 'काय परिस्थिती करून घेतली आहे हे एका व्हिडीओतून दिसत आहे. आता गद्दारांना आता क्षमा नाही. ज्यांना जायचे आहे त्यांना दरवाजे खुले आणि यायचे आहेत, त्यांनाही दरवाजे खुले  आहे. पण जे विकले गेलेत त्यांना दरवाजे बंदच आहे, असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. 'बंड केलेल्या आमदारांना कैद्यासारखे नेत आहेत. आरोपींसारखे आमदारांना घेऊन जात आहे.  आपण यांना काय कमी केलं, आरशात बघताना सुद्धा यांना लाज वाटत असेल. राज्यसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार संजय पवारांना पाडण्याचे काम आपल्याच फुटलेल्या आमदारांनी केलं, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. 'बिकाऊ लोकांनी पक्ष सोडलाय, शिवसैनिकांनी नाही. आपण सत्ताधारी आहोत हीच भुमिका शिवसैनिकांची असली पाहिजे. हे लोक दादागिरी  सामान्य लोकांवर करत होते. इच्छा होती तर सांगायचं मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यांच्यावर राग नाही आता हसायला येतंय. सुरत, गुहावटी अशी धावपळ करत आहे, जिथे पुर आलाय तिथे तुम्ही मजा करताय. सीआरपीएफची सुरक्षा काश्मिर पंडितांना द्यायची सोडून यांना दिली आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. २-४ आमदारांना जोर जबरदस्तीने घेऊन गेले. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा. मी तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. अधिवेशनामध्ये विश्वादर्शक ठराव, कधी ना कधी होणारच आहे. विमानतळावरून रस्ता हा वरळीच्या मार्गातून जातोय, हे लक्षात ठेवा की वरळी आहे, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या