'मुख्यमंत्री बनायचं होतं तर थेट सांगायचं,आरशात बघतानाही यांना लाज वाटत असेल'; आदित्य ठाकरे आक्रमक
'मुख्यमंत्री बनायचं होतं तर थेट सांगायचं,आरशात बघतानाही यांना लाज वाटत असेल'; आदित्य ठाकरे आक्रमक
हा पहिला असा बंड आहे, की सत्ताधारी पक्षातून आमदार विरोधी पक्षात गेले आहेत. आता आकड्यांचा खेळ कसाही दिसत असला आणि प्रत्येक आमदार तिथे गेला, तरी विजय शिवसेनेचाच होणार, असा विश्वास आदित्या ठाकरेंनी व्यक्त केला.
मुंबई 26 जून : युवासेना मेळाव्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) टीका केली आहे. बंड करायचाच असेल तर हिंमत दाखवून करा, असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी केलं. हा पहिला असा बंड आहे, की सत्ताधारी पक्षातून आमदार विरोधी पक्षात गेले आहेत. आता आकड्यांचा खेळ कसाही दिसत असला आणि प्रत्येक आमदार तिथे गेला, तरी विजय शिवसेनेचाच होणार, असा विश्वास आदित्या ठाकरेंनी व्यक्त केला.
Sanjay Raut Shiv sena : काय झाडी... काय डोंगर.... काय हाटील, राज्यात काय स्मशान हाय संजय राऊतांनी घेतला चांगलाच समाचार
आम्हीच शिवसेना, आमचाच धनुष्यबान, आम्हीच बाळासाहेब असं सांगतात. पण इतकीच लायकी असती, स्वाभिमान असता आणि लाज असती तर हे सुरतला पळाले असते का? थेट सांगायचं होतं की मला मुख्यमंत्री बनवा. पण हिंमत नव्हती म्हणून आधी सुरत आणि मग गुवाहाटीमध्ये पळाले. त्यांचा राग नाही तर हसायला येत आहे, की यांचा काय जोक झाला आहे.
ज्यांना जायचे आहे त्यांना दरवाजे खुले आहेत आणि ज्यांना शिवसेनेत यायचं आहे, त्यांनाही दरवाजे खुले आहेत. पण जे विकले गेलेत त्यांना दरवाजे बंदच राहातील. आपण यांना काय कमी केलं, आरशात बघतानासुद्धा यांना लाज वाटत असेल, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
मविआ सरकार कोमात अन् काँग्रेसच्या मंत्र्याने पंजाबी गाण्यावर ठेका धरला जोमात, VIDEO
जी सुरक्षा काश्मिरी पंडीत आणि आसाम पुरग्रस्तांना द्यायला हवी होती ती आमदारांना दिली गेली. दिवसाला यांचं खाण्यापिण्याचं बिल ८-१० लाख रुपये. हॉटेल आणि चार्टर्ड प्लेनचा खर्च किती असेल? असा सवालही आदित्या ठाकरेंनी केला.
मी बंडखोरांना चॅलेंज देतो की या आणि आमच्यासमोर येऊन बसा. मी त्यांना काहीही बोलणार नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार. पण त्यांनी डोळ्यात डोळे घालून सांगावं की आम्ही काय कमी केलं आणि यांनी असं का केलं?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.