Home /News /mumbai /

आदित्य ठाकरेंची ड्रग्स चाचणी केली पाहिजे, निलेश राणेंची मागणी

आदित्य ठाकरेंची ड्रग्स चाचणी केली पाहिजे, निलेश राणेंची मागणी

आदित्य ठाकरे यांचीदेखील ड्रग्ज चाचणी करण्यात यावी अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

    मुंबई, 03 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता तपासाला भलतंच वळण लागलं आहे. अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने बॉलिवूडमधील अनेकांची ड्रग्ज टेस्ट करा अशी मागणी केली असता आता भाजप नेते निलेश राणे यांनीसुद्धा शिवसेना नेते आणि पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांचीदेखील ड्रग्ज चाचणी करण्यात यावी अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. फक्त रणवीर-रणबीर यांनीच का? आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्ज चाचणी करावी, असं मला वाटतं. कारण तेही बॉलिवूडच्या आतल्या गोटातील कलाकारांच्या जवळचे आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे. तसंच पोलिसांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी कंगणावर निशाणा साधला. पोलिसांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असंही ते म्हणाले. '2/3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.'
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Sushant sing rajput, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या