News18 Lokmat

शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड

आदित्य ठाकरेंना शिवसेनेचं नेतेपद देण्यात आलं आहे. त्याचबरोबर युवासेना प्रमुख पदांवर आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा ठरावही मंजूर झाला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2018 02:14 PM IST

शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड

23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आणि याच जयंतीच्या निमित्तानं शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली आहे. त्यात आदित्य ठाकरेंना शिवसेनेचं नेतेपद देण्यात आलं आहे. त्याचबरोबर युवासेना प्रमुख पदांवर आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदावर पुन्हा उद्धव ठाकरेच असणार आहेत. गुलाबराव पाटील यांनी ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा ठरावही मंजूर झाला आहे. कार्यकारणी सभेच्या बाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडून हा आनंद साजरा केला आहे.

शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या संजय राऊतांच्या ठरावाला सगळ्या मंत्र्यांकडून मंजुरी देण्यात आली आहे. शिवसेना लोकसभेत २५ जागा आणि विधानसभेत १५० जागा स्वबळावर लढवणार आहेत. त्यामुळे यापुढील शिवसेनेच्या वाटचालीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईत वरळीमधील नॅशनल स्पोर्टस कॉम्प्लॅक्समध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याची बिनविरोध निवड झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2018 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...