Home /News /mumbai /

मुंबईकरांच्या फायद्याची बातमी, मुंबई पालिकेच्या प्रत्येक प्रभागात सुरु होणार IB शाळा; आदित्य ठाकरेंची माहिती

मुंबईकरांच्या फायद्याची बातमी, मुंबई पालिकेच्या प्रत्येक प्रभागात सुरु होणार IB शाळा; आदित्य ठाकरेंची माहिती

Aditya Thackeray BMC News: राज्याचे पर्यावरण (Maharashtra Environment Minister) मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

    मुंबई, 03 जुलै: राज्याचे पर्यावरण (Maharashtra Environment Minister) मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (International Baccalaureate) मंडळातील शाळा सुरु करणार आहेत. मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) येत्या काळात आंतरराष्ट्रीय (IB)बोर्डाच्या शाळा सुरू करणार असून विद्यार्थ्यांना त्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. बीएमसी अंतर्गत येणाऱ्या 24 प्रशासकीय प्रभागात प्रत्येकी एक सीबीएसई आणि एक आयसीएसई शाळा सुरू करणार असल्याचं वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पालिकेच्या नव्या शाळेचं उद्घाटन झालं. अझीझ बाग येथे पालिकेची सीबीएसई शाळा सुरु करण्यात आली. या शाळेत 400 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या उद्घाटन समारंभावेळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. हेही वाचा- मुंबईजवळच्या 'या' जिल्ह्यातही बोगस लसीकरण, बनावट प्रमाणपत्राचंही वाटप ही शाळा सुरू करणे हे माझं स्वप्न होतं. आज ते एक स्वप्न पूर्ण झालं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. तसंच 400 जागांसाठी आतापर्यंत 2 हजार अर्ज आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aaditya thackeray, BMC, Mumbai muncipal corporation, Shiv sena

    पुढील बातम्या