दिशा पाटनीनं बुधवारी वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरे यांना ट्विटरवनरून शुभेच्छा दिल्या. तिनं लिहिलं, ‘वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा...’ यासोबत दिशानं स्माइली आणि हार्टवाला इमोजी सुद्धा पोस्ट केला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्वीटमुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या वर्षी एका डिनर डेटनंतर दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांना एकत्र पाहिलं होतं. त्यानंतर या दोघांच्या नावाच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर एका मुलखातीत दिशानं आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुकही केलं होतं आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही शुभेच्छा दिल्या होत्या. संपादन- क्रांती कानेटकरThank you so much Disha! One of those few people who I can say “same to you” on 13th of June for a birthday wish! Keep shining and rising!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 13, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray