Home /News /mumbai /

अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळण्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले, मला कुणाच्या..

अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळण्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले, मला कुणाच्या..

भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उद्धव गटावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे (Aaditya Thackeray) गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. यात आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 5 जुलै : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पक्षात बंडखोरी करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी बडखोरी करणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. आदित्य ठाकरे दोन्ही दिवशी विधानसभेत हजर होते. दरम्यान, शिंदे गटाने व्हीपचं उंल्लधन केल्याच्या कारवाईत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं नाव वगळलं आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव वगळलं शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा? यावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेता पदावरुन हकालपट्टी केली होती. मात्र, नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेनेकडून अजय चौधरी यांची विधीमंडळ पक्षनेते करण्यात आली. शिवसेनेचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उद्धव गटावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव दिलेलं नाही. गोगावले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आता आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. सोमवारी शिंदे सरकारने विधानसभेत फ्लोअर टेस्ट पास केली आहे. त्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला. शिंदे सरकार यांना फ्लोर टेस्टमध्ये 164 मते मिळाली. तर विरोधकांना 99 मते मिळाली.

  ज्योतिष्यानेच सांगितलं शिंदे सरकार कधी पडणार? जयंत पाटलांनी सांगितला महिना

  मला कुणाच्या खास प्रेमाची गरज नाही मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सध्या आम्ही फक्त शिवसैनिकांचा आवाज ऐकत आहोत. सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. बंडखोरांनी एकदा आरशात पाहावं. आमचा व्हिप अधिकृत असून त्यानुसार कारवाई होईल. नाव वगळण्याविषयी विचारले असता, मला कुणाच्याही खास प्रेमाची गरज नसल्याचे आदित्य म्हणाले. राज्यातील एकूण परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचा दावाही ठाकरे यांनी केला.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Aaditya thackeray, Eknath Shinde

  पुढील बातम्या