अमित यांच्या लग्नाबद्दल विचारताच आदित्य ठाकरे म्हणतात...

अमित यांच्या लग्नाबद्दल विचारताच आदित्य ठाकरे म्हणतात...

राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्री या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांना मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका दिली.

  • Share this:

मुंबई, 7 जानेवारी : 'अमितच्या लग्नाला नक्कीच जाणार, जायला लागणारच. यामध्ये राजकारण नाही,' असं म्हणत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा असलेले अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांचे भाऊ आहेत.

राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्री या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांना मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका दिली. या घडामोडीची महाराष्ट्रात मोठी चर्चाही झाली. आता उद्धव ठाकरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरपित्याच्या भूमिकेत 'मातोश्री'वर पोहोचले होते. मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते. राज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचित आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. दोघा भावांमध्ये जवळपास तासभर गप्पा रंगल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत होते. पण या भेटीचे राजकीय अर्थ काढणं चुकीचं आहे, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा 27 जानेवारीला विवाह होणार आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे मुलाच्या लगीनघाईमध्ये व्यस्त आहेत. अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता. आता अमित आणि मिताली हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

VIDEO : सांगलीमधील प्रकाश आंबेडकर यांचं अनकट भाषण

First published: January 7, 2019, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading