मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'ला आदित्य ठाकरेंचा विरोध

मुंबईतल्या पायाभूत सुविधांसाठी 'मेट्रो' आवश्यक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टलाच आदित्य यांनी विरोध केल्याने राजकीय संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 03:20 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'ला आदित्य ठाकरेंचा विरोध

मुंबई 10 सप्टेंबर : मुंबईतल्या 'आरे'मध्ये मेट्रोसाठी कार शेड बनवण्याला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोध केलाय. 'आरे' बचावासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मुंबईत आरे ला हात लावला ते आम्ही सहन करणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तर आरेमध्ये मेट्रो कारशेड करता आलं नाही तर हा प्रोजेक्ट लांबणीवर पडेल अशी भूमिका  MMRC ची आहे. या कार शेडसाठी 2 हजार 700 झाडं कापली जाणार असून पर्यावरणवादी संघटनांनी त्याला विरोध केलाय. मुंबईतल्या पायाभूत सुविधांसाठी 'मेट्रो' आवश्यक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजक्टलाच आदित्य यांनी विरोध केल्याने राजकीय संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

( वाचा : झीरो डिग्री बारमध्ये लहान मुला-मुलींचा धिंगाणा, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा )

आदित्य ठाकरे म्हणाले, वृक्ष प्राधिकरणाने झाडं कापण्याला परवानगी दिलीय त्यामुळे लोकांमध्ये फसवलं गेल्याची भावना आहे. यासाठी जी झाडं कापली, माती टाकली याबाबत कोणावर गुन्हा दाखल होणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. MMRC कोर्टाला आणि मुंबईकरांना धमकी देत आहेत असा आरोपही त्यांनी केला.यासाठीचे कन्सल्टंट कोण आहे? त्यांना पकडायला हवं. विरोध का आहे हे सरकारने ऐकणं गरजेचं आहे. मेट्रो हवीय आम्हाला पण लोकांची फसवणूक करून नको असंही मत त्यांनी व्यक्त केलंय.

( वाचा : VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर )

वायफाय हॉटस्पॉट ऐवजी ऑक्सिजन हॉटस्पॉट काही वर्षांत द्यावा लागेल. एमएमआरसीए ने जे सांगितलंय जे दाखवलं जातेय ते खरं चित्र नाहीये. वाईल्ड लाईफ नाही असं सांगण्यात आलंय मग हे बिबटे तिथे कसे आहेत. आरेमध्ये रान मांजर, बिबटे, हरीण सगळे प्राणी आहेत. अनेक जीव जे आपल्याला माहीत नाहीय तेही या ठिकाणी आहेत. लोकांचा नकार असताना 4 वर्ष काही बोलत नाही आणि मग इथे नाही तर दुसरीकडे नाही होऊ शकत अस कसं म्हणू शकतात असंही ते म्हणाले.

Loading...

( वाचा : पंकजा मुंडेंची राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका, विरोधकांना मत न देण्याचं आवाहन )

तर सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारशेडसाठी विरोध करू नये असं म्हटलं होतं. पर्यावरण आणि विकासाचा समतोल राखला गेला पाहिजे असंही ते म्हणाले. पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करून प्रकल्प लांबविण्याचं काम अनेक लोक करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...