मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं नवं मिशन; मुंबईतल्या या बीचचा करणार कायापालट

आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं नवं मिशन; मुंबईतल्या या बीचचा करणार कायापालट

बीचला नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण 2460 चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. शिवाय माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर कल्चरल पाथवे करण्याची योजना आहे आणि त्याला QR कोडवाले दिशादर्शक असतील.

बीचला नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण 2460 चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. शिवाय माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर कल्चरल पाथवे करण्याची योजना आहे आणि त्याला QR कोडवाले दिशादर्शक असतील.

बीचला नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण 2460 चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. शिवाय माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर कल्चरल पाथवे करण्याची योजना आहे आणि त्याला QR कोडवाले दिशादर्शक असतील.

  मुंबई, 18 जानेवारी : राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या एका बीचचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. सी फेस आणि बीचचं स्वरूप पालटायचा प्लॅन त्यांनी केला आहे.

  आज माहीम बीच येथील बीच रिनोवेशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रिनोवेशन, दादर टिळक ब्रीज ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि वीर कोतवाल उद्यान रिनोवेशनच्या कामांची पाहणी केली. तसेच यावेळी या कामांच्या प्रस्तावांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

  माहीम बीचला नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण 2460 चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. याची माहिती आदित्य ठाकरेंनी घेतली. त्यांनी यापूर्वी वृक्षारोपणाच्या अभियानाची सुरुवात केली होती. या मोहीमेतून तिथे जवळपास एक हजार मोठे वृक्ष व 2200 छोटी झुडपं लावली गेली आहेत. पर्यटकांना हरित बीचचा आनंद लुटता येणार आहे. या बीचनजीक करण्यात येत असलेल्या सी फेसवर ओपन जीम देखील बनवली जाणार आहे. तसंच वॉच टॉवर सारखी अनोखी कल्पना इथे साकार होणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  यावेळी मंत्री ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासोबत वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला या ५ किलोमीटरच्या प्रस्तावित सायकलिंग ट्रॅकबद्दल देखील चर्चा केली. या ट्रॅक संदर्भातील व्यवहार्य शक्यतांबद्दल अभ्यास सुरू आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट दिली. या भेटीच्या सुरुवातीलाच त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. या मैदानाला खेळाचा, संस्कृतीचा, राजकारणाचा समृद्ध असा इतिहास आहे. या इतिहासाला कुठेही धक्का न लागू देता मैदानाचे पावित्र्य जपून याचा विकास करण्याचा मानस असल्याचं आदित्य यांनी जाहीर केलं.

  या मैदानात सकाळी व संध्याकाळी बरेच लोक चालायला व धावायला येतात. मात्र तिथे इतर खेळ खेळले जात असल्यामुळे प्रचंड धूळ उडते. या धुळीला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर आदित्य ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पुढच्या दहा वर्षांचा विचार करून भव्यदिव्य अशा मैदानाचा वापर करून रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या मार्गाने पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टीने व्ययहार्यता तपासण्यात यावी, असंही त्यांनी सांगितले.

  आदित्य ठाकरे यांनी यावेळी नवीन QR कोड असलेल्या दिशादर्शकांची देखील पाहणी केली. हे दिशादर्शक दिशा दाखवतीलच, मात्र त्याच्या सोबतच हे क्युआर कोड आपल्याला त्या रस्त्याच्या नावाचा इतिहास, माहिती सांगतील. प्रस्तावित माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर कल्चरल पाथवे बद्दलही यावेळी चर्चा झाली.

  First published: