आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी कापले संजय राऊतांच्या बंधुंचे नाव

आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी कापले संजय राऊतांच्या बंधुंचे नाव

सुनील राऊत यांना डावलण्यात आल्याने संजय राऊत यांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई,30 डिसेंबर: युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे देखील घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी मंत्रिमंडळाच्या यादीतून एका नेत्याचे नाव कापण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधु आणि आमहार सुनील राऊत यांचे नाव आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी मंत्र्याच्या यादीतून कापण्यात आले आहे.

शिवसेनेच्या दिग्गजांना डावलून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आदित्य ठाकरे सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांची पर्यावरण किंवा उच्चशिक्षण मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. सुनील राऊत यांना डावल्यात आल्याने संजय राऊत यांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

संजय राऊत नाराज..?

बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बंधू आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आपण नाराज नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

सरकार स्थापन करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका निभवली आहे. मी किंवा माझे कुटुंबिय नाराज नाही. आम्ही आयुष्यभर पक्षासाठी काम करणार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले. एक चांगले मंत्रिमंडळ राज्याचा कारभार करणार आहे. अनुभवी आणि हुशार नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे. हे सर्व मंत्री चांगले काम करुन राज्याला नवी दिशा देतील, असे संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले

उद्धव ठाकरेंनी फिरवली 'भाकरी', प्रस्थापितांना डावलले

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मोठे निर्णय घेतले आहेत. पक्षातील प्रस्थापितांना दूर करून नवीन चेहऱ्यांनी पसंती देण्यात आली आहे. यामध्ये मागच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या मंत्र्यांचाही समावेश असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेने दिग्गज आमदारांना वगळले. जे माजी मंत्री देखील होते. त्यात दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, रवींद्र वायकर, दीपक केसरकर यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना संधी देण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेतील फक्त आमदार अनिल परब यांनाच मंत्रिमंडळासाठी अधिकृत फोनवरून निरोप देण्यात आलाा आहे. तसेच जे दिग्गज आमदार मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते, त्यांना अद्यापही निरोप देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत मोठे बदल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारात सत्तेची भाकरी फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लाभला आहे. साेमवारी शिवसेना 13, राष्ट्रवादी 13 आणि काँग्रेसच्या 10 मंत्र्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतील. विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम हाेणार असून त्याच्या तयारीसाठी रविवारी दिवसभर राजशिष्टाचार विभागाकडून लगबग सुरू होती.

शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ:

गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, अनिल परब, शंभूराजे देसाई, उदय सामंत, बच्चू कडू, अब्दूल सत्तार, संदिपान भुमरे, राजेंद्र पाटील-येड्रावकर, शंकरराव गडाख.

दरम्यान, सोमवारी दुपारी 1 वाजता होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये, शिवसेनेच्या आमदारांना मंत्री म्हणून शपथविधी घेण्याचे आदेश स्वत: शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत.

First published: December 30, 2019, 12:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading