आदित्य ठाकरेंच्या स्वप्नाला मुंबई पालिकेनं दाखवली केराची टोपली!

आदित्य ठाकरेंच्या स्वप्नाला मुंबई पालिकेनं दाखवली केराची टोपली!

परंतु, हा प्रस्ताव भाजप आमदार आशिष शेलारांच्या मतदारसंघातला असल्यामुळे वेगवेगळी कारणे देऊन फेटाळण्यात आल्याची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी :  पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नाला शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं केराची टोपली दाखवली आहे. परंतु, हा प्रस्ताव भाजप आमदार आशिष शेलारांच्या मतदारसंघातला असल्यामुळे वेगवेगळी कारणे देऊन फेटाळण्यात आल्याची चर्चा आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या सर्व गड-किल्ल्यांच्या दुरुस्ती करून त्या पर्यटनासाठी खुला कराव्या, त्यासाठी खास पर्यटन विभाग सुरू करावा अशी सूचना अर्थसंकल्पात केली होती. पण, आज जेव्हा मुंबईतल्या बांद्रा परिसरातील वांद्रे किल्ला दुरुस्तीचा करण्याचा 20 कोटीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला तेव्हा काँग्रेसच्या सूचनेवरून तो फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं स्वप्नच भंगलं आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे राज्यभरातल्या किल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय ऐरणीवर असताना मुंबईतील किल्ल्यांची दुरुस्ती करून एक चांगला पायंडा महाविकास आघाडीला घालता आला असता. पण भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात किल्ला येतो या कारणावरून हे राजकारण करण्यात आलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

20 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावल्यामुळे मुंबईतले सर्व किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याच्या स्वप्नाला मात्र तडे देणारा ठरला आहे.

गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची गय नाही, राज्य सरकारने जाहीर केला नवा नियम

दरम्यान,  महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. गड किल्ल्यावर जर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना थेट जेलवारी भोगावी लागणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गड किल्ल्यांवर गैरवर्तन रोखण्यासाठी नवीन नियमाची घोषणा केली. गड किल्ल्यावर दारू पिऊन राडा  घालणाऱ्यांना यापुढे सहा महिने सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एकच व्यक्ती जर दुसऱ्यांदाही पुन्हा आढळून आल्यास त्याला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होईल.

गृहमंत्रलयाने याबद्दलचा आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये राज्यात सार्वजनिक दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली असून गड किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना ही शिक्षा लागू होणार आहे.

ज्या ठिकाणी मद्य प्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी जागा वगळता अन्य सार्वजनिक ठिकाणी दारुच्या नशेत गैरवर्तन केल्यास  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 (सन 1949 चा 25) मधील कलम 85 अन्वये शिक्षेबाबतच्या तरतूद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2020 06:08 PM IST

ताज्या बातम्या