Home /News /mumbai /

आदित्य ठाकरे, धनंजय मुंडेंसह 15 मंत्र्यांना वीजबिलचं नाही; सर्वसामान्यांना मात्र अव्वाच्यासव्वा बिलं

आदित्य ठाकरे, धनंजय मुंडेंसह 15 मंत्र्यांना वीजबिलचं नाही; सर्वसामान्यांना मात्र अव्वाच्यासव्वा बिलं

ठाकरे सरकारचा हा प्रताप माहिती अधिकारातून समोर आला आहे

    मुंबई, 27 सप्टेंबर : लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची जिथे हजारो रुपयांच्या वीजबिलामुळे दमछाक होत होती, तेथे राज्यातील 15 मंत्र्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांची वीजबिलं दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यात आलेली वीजबिल भरताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले होते. आधीच लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, त्यात भलमोठं विजेचं बिलं पाहून सर्वसामान्यांच्या संकटात भर पडली होती. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या नोकरदार.. सर्वसामान्य नागरिकांना बसला. मात्र आरटीआयमधून आलेल्या बातमीनंतर याच सर्वसामान्य नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. बड्या मंत्र्यांना विजेचं बिल का पाठविण्यात आलं नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. हे ही वाचा-LIVE : मी फडणवीस यांना भेटणार, हे उद्धव ठाकरेंना माहित होते - संजय राऊत त्यामुळे ठाकरे सरकारने या मंत्र्यांना वीजबिलं का पाठवली नाहीत? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात RTI कार्यकर्ता अनिल गलगली यांनी लोक निर्माण विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीजबिलाबाबत माहिती विचारली. लोक निर्माण विभागातील दक्षिण उप-विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, महासाथीदरम्यान लागू केलेल्या लॉकडाऊनमघ्ये वीजेचे बिल पाठविण्यात आले नाहीत. उपलब्ध कागदपत्रांनुसार 15 मेपासून 5 मंत्र्यांना गेल्या 5 महिन्यांपासूनची विजेची बिलं पाठविण्यात आलेले नाही. यामध्ये दादाजी भुसे, केसी पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठौड यांची नावे आहेत. तर गेल्या 4 महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड़, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील या विजेचे बिल पाठविण्यात आलेले नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aaditya thackeray

    पुढील बातम्या