आदित्य ठाकरेंना ठाण्यात खड्ड्यांचा फटका, निवडणुकीआधी उद्घाटनांचा धडाका

आदित्य ठाकरेंना ठाण्यात खड्ड्यांचा फटका, निवडणुकीआधी उद्घाटनांचा धडाका

'शहरात खड्डे पडले आहेत, हे जरी खरे असले तरी शहरात कामे सुरु आहेत. कामे सुरु असली तर अडचणी निर्माण होत असतात.'

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 15 ऑगस्ट : ठाण्यात गायमुख येथील चौपाटीच्या उदघाटन प्रसंगी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचं स्वागत खड्यांनी केले. त्याच्या गाड्यांच्या ताफ्याला खड्ड्यामुळे वाहतुकीचा देखील फटका बसला. शहरात जोपर्यंत कामे सुरु आहेत तोपर्यंत खड्डे पडणारच अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. ठाण्यात आल्यानंतर आदित्य यांच्या हस्ते अनेक कामांच्या उद्घघाटनांचा धडाका लावण्यात आला.

आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाची बाजू सावरून घेतली अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय.

दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये डान्सबारची छमछम, बारबालांवर पैशाचा पाऊस!

शहरात खड्डे पडले आहेत, हे जरी खरे असले तरी शहरात कामे सुरु आहेत. कामे सुरु असली तर अडचणी निर्माण होत असतात, कारण रस्त्यावर कामे सुरु आहेत. त्याठिकाणावरुन मोठी वाहने जात असतात, त्याला तुम्ही काहीच करु शकत नाहीत, त्यामुळे जोर्पयत कामे पूर्ण होत नाही तो रस्ता ठिक होणार नाही. काम पूर्ण झाली की रस्तेही चांगले होतील असे मतही त्यांनी व्यक्त केलं.

तसेच टिकुजिनी वाडी येथिल वनस्थळी उद्यानाच्या ठिकाणचे वसंत डावखरे यांच्या नावाचे फलक हटवून उद्यानाला वसंत डावखरे च नाव द्यावे असे भाजप गटनेते आणि स्थानिक नगरसेवक यांनी मागणी केली तत्काळ पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव द्यायचे जाहीर करून भाजपची नाराजी दुरकेली.

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का? सदाभाऊंचा हल्लाबोल

ठाण्यात टिकुजिनी वाडी वनस्थळी उद्यानाचा लोकार्पण सोहळा, आगरी कोळी भवन भुमिपजन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण आणि गायमुख घाट भुमीपुजन सोहळ्याच्या निमित्ताने ते आले होते, यावेळी पत्रकारांनी त्यांना शहरातील खडय़ांवरुन छेडले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्या समवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

बिबट्या मादी आणि तिच्या पिलाच्या भेटीचा चटका लावणारा VIDEO तुम्ही पाहिलाच पाहिजे

सध्याच्या घडीला जनआर्शीवाद यात्र महत्वाची नसून आमचे सर्व लक्ष हे कोल्हापुर आणि सांगली या भागांकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं. या ठिकाणी पुर ओसरला तरी तेथील साफसफाई आणि त्यांना मदत पोहचविणो गरजेचे आहे, त्याला आम्ही अधिक महत्व देणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसच्या पोलखोल यात्रेविषयी त्यांना छेडले असता ते कोणाची पोलखोल करणार स्वत:ची का? असा उलट सवाल उपस्थित करुन काँग्रेसची खिल्ली उडवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 09:41 PM IST

ताज्या बातम्या