आदित्य ठाकरेंचा 'लुंगी' प्रचार, लोकांनी करून दिली बाळासाहेबांची आठवण!

आदित्य ठाकरेंचा 'लुंगी' प्रचार, लोकांनी करून दिली बाळासाहेबांची आठवण!

निवडणूक राजकीय पक्षांना बदलण्यास भाग पाडते असं सांगत काही लोकांनी टीका केली तर आदित्य हे नव्या पिढीचे राजकारणी असल्याने त्यांची भूमिका योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय.

  • Share this:

मुंबई 15 ऑक्टोंबर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरळीत जोरदार प्रचार सुरू आहे. वरळी हा बहुभाषिक असल्याने आदित्य यांनी 'सोशल इंजिनिअरिंग' करत इथं प्रचाराला सुरूवात केलीय. वरळीत मराठी बहुसंख्य असले तरी इतर भाषिक मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. निवडणुकीत सगळ्यांनाच सोबत घेऊन जाण्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा कल सर्वांना सोबत घेऊन  प्रचार करण्याकडे असतो. वरळीत दाक्षिणात्य लोक असलेल्या भागात प्रचार फेरी काढताना त्यांनी खास दाक्षिणात्य लुंगी आणि अंगवस्त्रम् या पेहेरावात प्रचार केला होता. आदित्य यांच्या या प्रचाराचे फोटो सोशल मीडियावर आल्यावर लोकांनी त्यांना बाळासाहेबांच्या आंदोलनाची आठवण करून दिली नसती तरच नवल.

PMC बँक घोटाळा: खातेदाराचा जीव गेला, घोटाळेबाज मजेत, सरकार ढिम्म-प्रियंका गांधी

सोशल मीडियावर लोक काय प्रतिक्रिया देतील याचा काहीच नेम नसतो ते यावेळीही दिसून आलं. आदित्य यांच्या लुंगीतल्या प्रचाराचे फोटो येताच लोकांनी लगेच शिवसेनेच्या 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' आंदोलनाची आठवण त्यांना करून दिली. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी दाक्षिणात्यांविरूद्ध हे आंदोलन छेडलं होतं. त्याकाळात मुंबई माटुंगा आणि इतर काही भागात दाक्षिणात्यांची संख्या मोठी होती. मराठी माणसाचा नारा देत शिवसेनेनं भूमिपुत्रांसाठी आंदोलन उभारलं होतं. यातूनच बाळासाहेबांनी लुंगी हटावो हे आंदोलन छेडलं होतं.

पंकजा मुंडेंना बीडमध्ये धक्का, भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

त्या आंदोलनावरून देशभर वाद निर्माण झाला आणि शिवसेनेचं नाव सर्वदूर पोहोचलं. ही पार्श्वभूमी असताना ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे पाईक दाक्षिणात्य पेहेरावात प्रचार करत असल्याने त्यांच्यात झालेल्या या बदलाचा लोकांनी उल्लेख केला. आणि  शिवसेनेला चिमटेही काढले. निवडणूक राजकीय पक्षांना बदलण्यास भाग पाडते असं सांगत काही लोकांनी टीका केली तर आदित्य हे नव्या पिढीचे राजकारणी असल्याने त्यांची भूमिका योग्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय. मराठी अस्मितेचा मुद्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि त्यांचा दक्षिण आणि उत्तर भारतीयांवरुद्धचा विरोध मावळत गेला. शिवसेना जस जसी वाढायला लगाली तसं त्यांची भूमिका सर्व व्यापी झाल्याचं मतही लोकांनी व्यक्त केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 15, 2019, 7:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading