ठाकरेंचे दोन 'युवराज' एकत्र; हॉटेलमध्ये केलं डिनर

ठाकरेंचे दोन 'युवराज' एकत्र; हॉटेलमध्ये केलं डिनर

रात्री मुंबईच्या लोअर परळ भागातील सेंट रेगिस हाॅटेलमध्ये या ठाकरे बंधूंनी भेट घेतली आणि एकत्र डिनरही केलं.

  • Share this:

मुंबई,17 सप्टेंबर:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे  यांनी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची भेट घेतली.   रात्री मुंबईच्या लोअर परळ भागातील सेंट रेगिस  हाॅटेलमध्ये  या ठाकरे बंधूंनी भेट घेतली आणि एकत्र डिनरही केलं.

मुंबईत सध्या  प्रीमियर फुटबॉल लिग चालू आहे.  या लिगनिमित्त जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मुंबईत आले आहेत.  या खेळाडूंच्या   आदरातिथ्याबाबतची जबाबदारी अमित ठाकरे यांनी स्विकारली आहे. या खेळाडूंना भेटण्यासाठी आदित्य ठाकरेंनी अमित यांना विचारणा केली होती. त्यानुसार या खेळाडूंना भेटायला अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना बोलवलं. खेळाडूंची भेट घेतल्यानंतर  हे दोघं एकामेकांस भेटले. या भेटीत जेवण आणि दिलखुलास गप्पा झाल्याची सुत्रांची माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...