संभाजी महाराजांचा 'त्या' यादीत समावेश करा, अमोल कोल्हेंची मागणी

संभाजी महाराजांचा 'त्या' यादीत समावेश करा, अमोल कोल्हेंची मागणी

'महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे'

  • Share this:

मुंबई, 13 मे : लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे. राज्य सरकारकडून महापुरुषांची जी यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत  छत्रपती संभाजी महाराज यांचा समावेश करावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्वीट करून राज्य सरकारने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे, त्यात दुरस्ती करण्याची विनंती केली आहे.

'महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की, त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी' अशी मागणी कोल्हे यांनी केली.

अमोल कोल्हे यांनी याआधीही राज्य सरकारकडे वेळोवेळी विविध मागण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागण्या केल्या होत्या.

हेही वाचा - बाजार करण्यासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, भरधाव ट्रकनं चिरडलं

अमोल कोल्हे यांनी  छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांचीही मालिका महाराष्ट्राच्या घरात घरात पोहोचली होती. अलीकडे लॉकडाउनच्या काळात या मालिकेचं पुन्हा एका प्रसारण सुरू करण्यात आलं होतं.

कोल्हे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला होता.

अमोल कोल्हेंची पत्नी आहे 'कोरोना योद्धा'

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे देखील रुग्णसेवा करत आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या कोरोनाबाधितांची सेवा करत आहेत. त्या केईएममध्ये 2009 पासून कार्यरत आहेत. त्यामुळे आता अटीतटीचा प्रसंग असताना देखील त्या मागे हटलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आला 'वॉरिअर रोबोट', पाहा VIDEO

रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या अश्विनी कोल्हे या नित्यनियमाने रुग्णांची सेवा करत आहेत. घरची जबाबदारी सांभाळून त्या रुग्णसेवेचं व्रत पार पाडत आहेत. डॉ. अमोल कोल्हे देखील विविध माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. डॉ. अश्विनी कोल्हे आणि डॉ. अमोल कोल्हे हे दाम्पत्य ही मदत करताना दिसत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 11:22 AM IST

ताज्या बातम्या